केंद्र सरकारच्या परवानगीनंतर ‘या’ 2 देशांना ‘सीरम’नं पाठवली लस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विरुद्धची लस काही देशांमध्ये उपलब्ध झाली आहे. भारतात सिरम इस्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या कोविशील्ड आणि कोवॅक्सीन च्या लसीकरणास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हि लस देण्यात येणार आहे. दरम्यान लसीची व्यावसायिक निर्यात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असून, शुक्रवारी एस्ट्रझेंनेका आणि ऑक्सफाेर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीची भारतातील सिरम इस्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे निर्मिती करण्यात येत आहे. या लसीची पहिली ऑर्डर ‘सिरम’ने ब्राझील आणि माेराेक्काे या देशांना पाठविली.

यासंदर्भात आराेग्य सचिव हर्षवर्धन श्रींगला यांनी सांगितले की, देशातील लसनिर्मिती क्षमतेचा मानवतेच्या दृष्टिकाेनातून सर्वांसाठी वापर करण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी दिले हाेते. त्यानुसार लसीच्या व्यावसायिक विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. जगभरातून भारतामध्ये निर्मित लसींना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सर्वप्रथम या आठवड्याच्या सुरुवातीला शेजारील नेपाळ, बांग्लादेश, भूतान आणि मालदीव या देशांना काही लसी माेफत पाठविण्यात आल्या हाेत्या. त्यानंतर आता ब्राझील आणि माेराेक्काे या देशांसाठी लस पाठविण्यात आली आहे. यानंतर दक्षिण आफ्रिका आणि साैदी अरबला लसी पाठविण्यात येतील.

वाराणसीतील महिला कर्मचाऱ्याशी मोदींचा संवाद –
१६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वाराणसीत लस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमात मोदी यांनी या अभियानाची माहिती घेतली. कर्मचारी पुष्पा देवी यांना सर्वात प्रथम लस देण्यात आली होती. त्यांच्याशी मोदी यांनी चर्चा केली. त्या म्हणाल्या की, मी स्वत:ला भाग्यवान मानते. मी सुरक्षित आहे.

तामिळनाडूच्या मंत्र्यांनी घेतली लस –
तामिळनाडूचे आरोग्यमंत्री विजयभास्कर यांनी शुक्रवारी कोवॅक्सिन लस घेतली. कोरोना लस सुरक्षित आहे की नाही, अशा संभ्रमात अनेक लोक असताना विजयभास्कर यांच्या कृतीने त्यांना लस घेण्यास प्रेरणा मिळणार आहे.

कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याचे निष्कर्ष पुढील महिन्यात सादर
तिसरा टप्पा पूर्ण न करताच कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला मान्यता दिल्याने या लसीच्या गुणवत्तेबद्दल काही डॉक्टर व सामान्य माणसांनीही शंका व्यक्त केली होती. मात्र,
कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्षांचा अहवाल भारत बायोटेक कंपनी पुढील महिन्यात औषध महानियंत्रकांना सादर करण्याची शक्यता आहे.