बारामतीत प्रकाश आंबेडकरांच्या सभेला पोलिसांनी नाकारली परवानगी ?

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – ज्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली, त्या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या तीन हत्ती चौकातील सभेला परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी भेदभाव करु नये, जर सभेला परवानगी दिली नाही तर आपण उपोषण करु असा इशारा वंचित आघाडीचे बारामती विधानसभेचे उमेदवार अविनाश गोफणे यांनी दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे १६ ऑक्टोंबरला बारामतीला येत असून तीन हत्ती चौकात त्यांच्या जाहीर सभेचे नियोजन केले आहे. यापूर्वी महाजनादेश यात्रेदरम्यान १४ सप्टेबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा तीन हत्ती चौकात पार पडली होती. इतर पक्षाच्या सभाही या चौकात झाल्या आहेत.

याबाबत गोफणे यांनी सांगितले की, अ‍ॅड. आंबेडकर यांच्या तीन हत्ती चौकात सभेसाठी परवानगी देण्यासाठी कायदेशीर नियम व अटींची पूर्तता करण्यास आम्ही तयार आहोत. या प्रचार सभेला परवानगी नाकारल्याचे पोलीस प्रशासनाने तोंडी व मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविले आहे. सभेसाठी कोणताही भेदभाव होऊ नये. आंबेडकर यांच्या सभेस परवानगी मिळेपर्यंत आपण मंगळवारी १५ ऑक्टोबरपासून बारामती शहर पोलीस ठाण्याबाहेर आमरण उपोषणास बसणार असल्याचे गोफणे यांनी सांगितले.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी