सेवाग्राम आश्रमात काँग्रेसला बैठकीसाठी परवानगी नाकारली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीपर्वाच्या निमित्ताने २ ऑक्टोबरला सेवाग्राम आश्रमात काँग्रेसने राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांनी सेवाग्राम आश्रम परिसराचा आढावा घेतला. परंतु, आश्रम प्रतिष्ठानने पक्षाच्या बैठकीस राजकीय कार्यक्रम या सबबीखाली परवानगी नाकारली आहे. दरम्यान, आश्रमात भाजपचा सहभाग असणाऱ्या कार्यक्रमांना नेहमीच परवानगी दिली जाते. मात्र, आता काँग्रेसला राष्ट्रीय बैठकीसाठी परवानगी नाकारल्याने पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’086b0254-c46d-11e8-b1d8-0d2db4797568′]

काँग्रेसला बैठकीस परवानगी नाकारल्यानंतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.एन.आर. प्रभू म्हणाले, राजकीय कार्यक्रमास मनाई करण्याची परंपराच मी पाळत आहे. याठिकाणी सर्वाचेच स्वागत आहे. आश्रमाच्याच प्रार्थनेत सहभागी व्हावे, हा हट्ट नाही. कुणी केव्हाही या परिसरात प्रार्थना करू शकतो. आश्रमाचा परिसर जुना असल्याने काही झोपडय़ा जीर्णावस्थेत आहे, म्हणून राहुल गांधी आणि त्यांच्या १०० सहकाऱ्यांनाच प्रवेश देण्याचे बंधन मी घातले. आश्रम परिसरालगत असणाऱ्या जागेवर अन्य संस्थेची मालकी असल्याने मी त्याविषयी बोलणार नाही, असे प्रभू यांनी स्पष्ट केले. काँग्रेसवर राग आहे, असे समजण्याचे कारण नाही, असाही खुलासा त्यांनी केला.

पोलिओच्या लसीमध्ये व्हायरस आढळल्याने मॅनेजरला अटक

आश्रमात राजकीय कार्यक्रम घेण्यास मनाई असल्याचे आश्रमवासी सांगीतले असले तरी आश्रमात होणाऱ्या शासकीय कार्यक्रमांना भाजपच्या नेत्यांची उपस्थिती असते, त्यास आश्रमाने कधीही आक्षेप घेतलेला नाही. गांधीविचारास विरोध करणाèयांचे आश्रमातील कार्यक्रम आश्रमप्रशासनास कसे काय चालतात? असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.

काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेण्यास विरोध होत असल्याचा प्रचार झाल्याने आश्रमवासी अडचणीत आले आहेत. आश्रम प्रतिष्ठान पदाधिकाऱ्यांची निवड करणाऱ्या सर्वसेवा संघाने आश्रमालगतचाच परिसर पर्याय म्हणून काँग्रेसपुढे ठेवला आहे. त्यामुळे बैठक ऐतिहासिक करण्याचा काँग्रेस नेत्यांचा संकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.

[amazon_link asins=’B00QESWIV6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’11e5ce6a-c46e-11e8-add5-cdfb89efec6f’]

याच गांधीवाद्यांचे पूर्वसूरी असलेल्यांनी डॉ. मनमोहन सिंग सरकारने दिलेली पाच कोटी रुपयांची मदत नाकारली होती. सरकारी मदत न घेण्याचा संकल्प असल्याचे त्यावेळी सांगणाऱ्या या गांधीवाद्यांनी राजकीय कार्यक्रमास अस्पृश्य ठरविले होते. आता मात्र त्यांची भूमिका बदललेली दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भरघोस आर्थिक मदतीने तयार होत असलेल्या सेवाग्राम विकास आराखडय़ासाठी ही मंडळी समरसून सहकार्य करीत असल्याने काँग्रेस समर्थकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.