काबुलमध्ये महिलांसाठी ‘स्विमींग’ पूल ! तालिबाननं आणली होती बुरख्यावर ‘बंधन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये महिलांना जलतरण तलावात (स्विमिंग पूल) पोहण्याची परवागणी देण्यात आली आहे. परंतु याबरोबच काही अटी देखील घातल्या गेल्या आहेत. काबुलमध्ये पहिला जलतरण तलाव 2001 मध्ये सुरु करण्यात आला होता आणि हा तलाव फक्त पुरुषांसाठी होता. परंतु आता दोन तलाव महिलांसाठी पोहण्यास सुरु करण्यात आले आहेत, यातील एक जलतरण तलाव अमू पश्चिम भागात आहे.

एका वृत्तानुसार जलतरण तलावात महिलांना पोहण्यासाठी काही नियम मात्र लावण्यात आले आहेत. येथे येण्यापूर्वी महिलांना आपले मोबाइल फोन बंद करावे लागतील, कारण फोटो काढण्यास येथे परवानगी नाही.

एका वृत्तानुसार एक महिला या संबंधित सांगते की जेव्हा ती जलतरण तलावात पोहत असते तेव्हा ती तालिबानी हल्ल्याची किंवा आत्मघाती हल्ल्याचा विचार करत नाही. काबुलमध्ये तालिबान शासनादरम्यान महिलांना खेळ, सार्वजनिक शिक्षण, नोकरी करण्यास परवानगी नव्हती परंतु 2001 मध्ये तालिबानला अमेरिकेने सत्तेतून हटवले. याशिवाय अनेक मुस्लिम देशात महिलांना अनेक नियम-अटी सहन कराव्या लागतात. बंधनात रहावे लागते. सौदी अरब सारख्या अनेक देशांनी आता अनेक बंधन हटवली आहेत.

महिलांना चारचाकी चालवण्यास परवानगी
सौदी अरबमध्ये महिलांना गाडी चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाचे फक्त सौदी अरब मधील महिलांकडूनच नाही तर जगभरातून स्वागत करण्यात आले.

ड्रेस कोडमध्ये सूट
सौदीमध्ये महिलांना ड्रेस कोडमध्ये सूट दिली होती. मात्र ठरवून दिल्याप्रमाणेच त्यांना पोशाख करावा लागेल.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/