राज्यात प्रतिबंधित क्षेत्राबाहेर वॉटरस्पोर्ट्स, बोटिंग आणि पर्यटन स्थळांना परवानगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सरत्या वर्षाचा शेवट गोड करणार असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोनबाहेरील वॉटरस्पोर्ट्स, बोटिंग, अॅम्युजमेंट पार्क आणि पर्यटनस्थळी इनडोअर मनोरंजन कार्यक्रमांना राज्य सरकारने परवानगी दिली आहे. महसूल आणि वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन मंत्रालयाने यासंदर्भातले परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे.

नेमकं काय सुरु होणार?

१. कंटेन्मेंट झोनबाहेरील जलक्रीडा त्यात नौकानयन आणि अन्य मनोरंजन खेळांना परवानगी.
२. कंटेन्मेंट झोन बाहेरील अॅम्युजमेंट पार्क, पर्यस्थळाजवळील इनडोअर मनोरंजन कार्यक्रमांना परवानगी.
३. कंटेन्मेंट झोन बाहेरील पर्यटन स्थळ सुद्धा सुरु करण्याची परवानगी.
दरम्यान, याठिकाणी सामाजिक अंतर त्याचसोबत कोविड-१९ च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.