हुंड्यासाठी विवाहीतेचा मानसिक छळ, सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन

हनुमंत चिकणे

सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाविरुद्ध शितल मंगेश वाघमारे ( वय १९, रा. साडेसतरा नळी, हडपसर, पुणे – २८. सध्या रा. चव्हाण वस्ती, थेऊर, ता. हवेली ) या विवाहितेने सासरच्या मंडळीविरुद्ध लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दिली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’58330290-cbe4-11e8-ae5a-db9a5795a3c9′]

याप्रकरणी पती मंगेश तुकाराम वाघमारे, नणंद उषा तुकाराम वाघमारे व सासू बायडाबाई तुकाराम वाघमारे (रा. साडेसतरा नळी, दत्तनगर, दत्त मंदिराचे जवळ, हडपसर, पुणे) या तिघांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितल व मंगेश यांचा विवाह १८ जून २०१८ रोजी थेऊर फाटा येथे झाला. विवाहपुर्व बोलण्यात मंगेश याने मी शासकीय नोकरीत असून मला चांगला पगार मिळतो. तसेच माझी ४ ते ५ ठिकाणी जागा आहे. असे सांगितले होते. लग्नात शितल हिचे वडिलांनी हुंडा म्हणून रोख रक्कम दिली होती. ती सासरी साडेसतरा नळी येथे नांदण्यास आलेनंतर १० ते १५ दिवस तिला चांगले नांदवले. त्यानंतर नणंद उषा व सासू बायडाबाई या तुझ्या वडिलांनी लग्नात पैसे, व दुचाकी दिली नाही. तु माहेरुन मागवून घे. असे म्हणून त्रास देवू लागल्या. घरातील सर्व कामे तिलाच करावी लागत होती. कामे केली नाही तर शिवीगाळ दमदाटी करत असत.
[amazon_link asins=’B07B1B5CVK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6755850d-cbe4-11e8-a874-63bcfcabd38e’]

अवघ्या चार महिन्यांपूर्वी, विवाह झालेल्या विवाहितेला माहेरुन पैसे आणण्याच्या तसेच लग्नात हुंडा म्हणून रोख रकमेसह मांडणी आणी दुचाकी दिली नाही म्हणून शिवीगाळ, मारहाण करुन शारीरिक आणि मानसिक छळ देण्यास सुरुवात केली. १४ ऑगस्ट ला त्यावेळी नवरा, ननंद व सासू या तिघांनी तु तुझ्या वडिलांकडून पैसे घेऊन ये. अन्यथा तुला व तुझ्या भावाला आम्ही गाठून मारू अशी धमकी दिली. व मारहाण करुन शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्यावेळी तिने वडिलांना बोलावून घेतले व माहेरी थेऊर येथे निघून आली.
लोणी काळभोर पोलिसात नवरा, नणंद व सासू विरोधात तक्रार दिली असून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील हे करीत आहेत.