Facebook वर ‘सुसाईड’ पोस्ट शेअर करून नगरपालिकेच्या ठेकेदाराची आत्महत्या

जनपद (युपी) : वृत्तसंस्था – चंदननगर नगरपालिकेतील ठेकेदाराने फेसबुकवर आत्महत्या करत असल्याची पोस्ट शेअर करून विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील चांदपुर येथे घडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली असून विष पिल्यानंतर ठेकेदाराला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Facebook पर डाली सुसाइड की पोस्ट, कुछ ही म‍िनटों बाद खा ल‍िया जहर

साहिल अनवर जैदी (रा. चांदपुर) असे आत्महत्या केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. साहिल याने नगरपालिकेचे नगराध्यक्ष यांचा मुलगा अरशद अंसारी याच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याची पोस्ट फेसबुकवर शेअर करून विष पिले. त्यानंतर साहिल यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. साहिल याने मृत्यूपूर्वी फेसबुकवर शेअर केलेल्या सुसाईड नोट वरून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Facebook पर डाली सुसाइड की पोस्ट, कुछ ही म‍िनटों बाद खा ल‍िया जहर

कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल जैदी हे चंदननगर नगरपालिकेत ठेकेदार आहेत. ठेकेदारी व्यवसायातील आर्थिक देवाण-घेवाणीतून नगरपालिकेचे नगराध्यक्ष यांचा मुलगा अरशद अंसारी त्याला त्रास देत होता. साहिल यांच्याकडे असलेल्या पैशासाठी अंसारी याने तगादा लावला होता. जैदी यांना अडचणी असल्याने ते पैशांची परतफेड करू शकत नव्हते. त्यामुळे साहिल यांनी रात्री फेसबुकवर आत्महत्या करत असल्याची पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी नगराध्यक्ष यांचा मुलगा अंसारी आणि त्याचे साथिदार आपल्याला पैशासाठी त्रास देत असून त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहले. आपल्या मृत्यूला अंसारी आणि त्याचे साथिदार जबाबदार असल्याचे लिहले आहे.

Facebook पर डाली सुसाइड की पोस्ट, कुछ ही म‍िनटों बाद खा ल‍िया जहर

फेसबुकवर पोस्ट शेअर केल्यानंतर साहिल यांनी विष पिले. त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान 30 ऑक्टोबर रोजी रात्री मृत्यू झाला. साहिल यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टनुसार कोतवाली पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Facebook पर डाली सुसाइड की पोस्ट, कुछ ही म‍िनटों बाद खा ल‍िया जहर

Visit : Policenama.com