Coronavirus : ‘कोरोना’चा देशातील चौथा बळी, पंजाबमध्ये COVID-19 नं संक्रमित व्यक्तीचा मृत्यू

चंडीगड : वृत्तसंस्था – पंजाबच्या नवाशहर जिल्ह्यातील एका हॉस्पिटीलमध्ये मृत्यू झालेल्या एका 72 वर्षीय व्यक्तीला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, हा रूग्ण दोन आठवड्यापूर्वी इटलीहून जर्मनी आणि जर्मनीतून भारतात परतला होता. छातीत वेदना होऊ लागल्याने त्यास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेचे(पीजीआयएमईआर) संचालक जगत राम यांनी सांगितले की, मृताला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या होती. त्याचे नमूणे तपासणीसाठी पाठवले असता ते पॉझिटीव्ह असल्याचा आहवाल आला आहे. बुधवारी बांगा सार्वजनिक आरोग्य केंद्रात त्याचा मृत्यू झाला होता.

आरोग्य अधिकार्‍यांनी त्याच्या मृत्यूच्या स्पष्ट करणाला दुजोरा दिलेला नाही आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही तोबडतोब कोणतीही माहिती मिळालेली नाही. जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन प्रसाद भाटिया यांनी सांगितले की, हा मृत रूग्ण सात मार्चला इटली ते जर्मनी आणि तेथून भारतात परतला होता.

बुधवारी रात्री आला अहवाल

भाटिया यांनी सांगितले की, बांगा येथील या रूग्णाला छातीत वेदना तीव्र वेदना होऊ लागल्याने आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले होते. यानंतर तो त्वरीत बेशुद्ध झाला. त्याच दिवशी नंतर त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर तपासणी अहवाल आला आहे.

राज्याचे मुख्य सचिव (आरोग्य) अनुराग अग्रवाल या घटनेला दुजोरा दिला आहे की, बांगा येथील मृत व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशाच्या विविध भागातून 18 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर कोरोना व्हायरसच्या एकुण रूग्णांची संख्या गुरूवारी 169 वर पोहचली आहे. पंजाबमध्ये यापूर्वी आणखी एक रूग्ण सापडला होता.