धक्कादायक ! मतदार यादीत नाव नाही, एकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

तिरुवनंतपूरम : वृत्तसंस्था – बसपा ऐवजी चुकून बीजेपीला मत केल्यामुळे एका मतदाराने आपले बोट कापून घेतल्याची घटना ताजी असताना आता केवळ मतदार यादीत नाव नसल्यामुळे एका व्यक्तीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. केरळमध्ये आज २० जणांवर मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेत वेगवेगळ्या केंद्राबाहेर ७ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कन्नर जिल्ह्यात चोकली येथे रामविसासम येथील केंद्रात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. तर वेणुगोपाल यांचा मतदान करून घरी जात असताना मृत्यू झाल्याचे समजते आहे. तसेच पटनाथिट्टा जिल्ह्यात ६६ वर्षीय चाको मथाई यांचा तर एर्नाकुलम येथे थ्रेस्य कुट्टी यांचा मृत्यू झाला आहे.

याशिवाय कोल्लम येथील किलोकोल्लूर शाळेतील मतदान केंद्रावर मणी यांचा मृत्यू झाला. तर वायनाडमधील आदिवासी कॉलनीतील के. बालन आणि मावेलिक्करा येथील के प्रभाकरण यांचा देखील मृत्यू झाल्याचे समजते आहे. याशिवाय आळपुल्ला येथील केंद्रावर एका अधिकाऱ्याला हार्ट अटॅक आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज (मंगळवारी) देशातील १४ राज्यातील ११७ जागांसाठी मतदान होत आहे.