धक्कादायक ! मुलांना मारून टाकण्याची धमकी देत पिंपरीमध्ये महिलेवर बलात्कार

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाइन – मुलांना मारुन टाकण्याची धमकी देत एका विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून शरीरसंबंध ठेवण्यासाठी महिलेला अनेक प्रकारे धमकावून आणि संधी मिळताच तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. विपुल कासार (वय-३९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पीडित महिलेच्या व्हॉटसअ‍ॅपवरील डीपी संग्रिहत करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपीने पीडितेला दिली होती. त्यानंतर दोन मुलांना मारून टाकेन अशीही धमकी आरोपीने दिली होती. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यावर तो सतत तिला फोन करत होता. तु मला खूप आवडतेस, तुला वेळ असेल त्यावेळी माझ्याशी बोलत जा, मला भेटत जा असे आरोपी पीडित महिलेशी बोलत होता. हा प्रकार तिने आपल्या पतीला सांगितल्यानंतर पतीने विपूल याला समज दिली होती. काही दिवस गेल्यानंतर त्याने पुन्हा महिलेला फोन करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर त्याच्याशी बोलण्यासाठी त्याने महिलेला मोबाईल आणि सिमकार्ड दिले होते. मुलांना मारुन टाकण्याची धमकी दिल्याने पीडित महिला त्याच्याशी बोलत होती. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like