मजा येत नाही म्हणून त्यानं चक्क ‘PORN’ साईटविरोधात दाखल केला ‘खटला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील एका कर्णबधीर व्यक्तीनं चक्क पॉर्न साईटविरोधातच खटला दाखल केला आहे. तीन वेबसाईटवर त्यानं भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. पॉर्न पहात असताना सबटायटल देण्यात आले नसल्याने पूर्णपणे मजा घेता आली नाही अशी तक्रार करत त्या व्यक्तीनं अर्ज दाखल केला आहे. यारोस्लाव सुरीज असं या व्यक्तीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यारोस्लाव सुरीजनं ब्रुकलीन फेडरल कोर्टात हा खटला दाखल केला आहे. सुरीजने पॉर्नहब, रेडट्युब आणि युपॉर्न या वेबसाईटची कॅनडातील मुख्य कंपनी माइंडगीकविरोधात खटला दाखल केला आहे. सुरीजनं म्हटलं की या वेबसाईटनं अमेरिकन्स विद डिसेबॅलिटी अ‍ॅक्ट(दिव्यांगांसदर्भात कायदा)चं उल्लंघन केलं आहे. सुरीजनं याआधीही फॉक् न्यूजविरोधात खटला दाखल केला आहे.

पॉर्न साईटविरोधात तक्रार दाखल करताना सुरीजनं 23 पानांचा अर्ज लिहिला आहे. सुरीज आपल्या म्हणतो, “सबटायटल नसेल तर कर्णबधीर किंवा कमी ऐकायला येणाऱ्या लोकांना व्हिडीओचा पूर्ण आनंद घेता येत नाही. सर्वसामान्यांना फरक पडत नाही.” असंही त्यानं म्हटलं आहे. सुरीजनं नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली आहे. वेबसाईट्सनं सबटायटल देणं गरजेचं आहे असंही तो म्हणाला आहे. पॉर्नहब वेबसाईटचे उपाध्यक्ष कोरी प्राइस यांनी म्हटलं आहे की, त्यांच्या वेबसाईटवर सबटायटल असलेलं एक सेक्शन असून त्या सेक्शनची लिंकही वेबसाईटवर देण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/