विमा धारक हरवल्यास कुटुंब या 4 पध्दतीनं मिळवू शकतं विम्याचा हक्क, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  अलीकडच्या काळामध्ये विमा पॉलिसी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. विमा घेतल्यानंतर जर विमाधारकाचा मृत्यू झाला किंवा दुर्घटनेवर नामित व्यक्ती (Person) किंवा सदस्य या विम्यावर दावा करू शकतात. विमा  धारकाच्या मृत्यूवर दावा घेणे सोपे असले तरी विमाधारक व्यक्ती (Person) जर हवली असेल किंवा त्याच्या अस्तित्वाची अथवा मृत्यूची माहितीच नसेल तर दावा मिळवणे खूप अवघड असते.

Pune : मोक्क्याच्या गुन्हयात फरार असलेला अन् ठोंबरे टोळीचा मुख्य सुत्रधार सुरज ठोंबरला हैदराबाद येथून अटक; आंदेकर टोळीतील एकाच्या खुनाचा केला होता प्रयत्न

मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर नियमांशिवाय दावा करू शकत नसल्यानं बऱ्याचदा अडचणी येत असतात.
नैसर्गिक आपत्तींमध्ये विशेषत: विशेषत: चक्रीवादळ, भूस्खलन, भूकंप इत्यादीमध्ये पॉलिसीधारक हरवले तर
ही समस्या आणखी वाढते.पण नियमांनुसार काही गोष्टींची काळजी घेतली तर ही प्रक्रिया सहज सुलभे होते.
हरवलेल्या सदस्यानंतर कटुंबानं कसा करावा दावा जीवन विमा पॉलिसी हरवलेल्या व्यक्तीच्या नावे असेल तर कुटुंब विमा दावा करून आर्थिक सहाय्य मिळवू शकेल.
काही कायदेशीर प्रक्रिया पार पाडनू हरवलेल्या व्यक्तीला मृत घोषित करावे लागेल.

केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; जिल्हा व नागरी बँकांच्या अस्तित्वासाठी टास्क फोर्स

न्यायालयात याचिका दाखल करायची नैसर्गिक आपत्तीत विमाधारक हवला असल्यास त्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र कुटुंबाने प्रथम घ्यावे.
त्यानंतर न्यायालयात याचिका दाखल करावी.
हरवलेल्या व्यक्तीस सिद्ध करण्यासाठी कायदेशीर वारसांना एफआयआरची प्रत आणि शोध न घेता येणारा पोलीस अहवालदेखील सादर करावा लागेल.
त्यानंतर तपासणीत खात्री झाली की, ती व्यक्ती खरोखरच हरवली आहे तर त्याला न्यायालयातर्फे मृत मानले जाऊ शकते.
अशा परिस्थितीत विमा कंपनीला पैसे भरण्यास न्यायालय सांगू शकते.
तर दुसरीकडे पूर, भूकंप, दुष्काळमुळे विमाधारक हरवला असेल तर सरकार या काळात हरवलेल्या लोकांना मृत मानते.

तसेच हरवलेल्या व्यक्तींची यादी दिल्यास कुटुंबातील सदस्य दाव्यासाठी अर्ज करू शकतात त्यामुळे दाव्यासाठी सात वर्षे थांबण्याची गरज नाही.
सात वर्षे वाट पाहावी लागेल जर विमाधारक व्यक्ती हरवली असेल तर त्याच्या कुटुंबाला हरवल्याचा गुन्हा दाखल करावा लागतो.
त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातो. त्याचा शोध लागला नाही तर सात वर्षानंतर विम्याचा दावा करतो. कारण भारतीय पुरावा अधिनियम कलम १०८ नुसार या काळात हरवलेल्या व्यक्तीला मृत मानले जाते.