अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी व्हायरल करणारा पोलीस ‘गाेत्यात’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस आयुक्तांच्या बदल्या बाबतची यादी सोशल मीडियात व्हायरल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही केली जाणार आहे. असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी म्हटले आहे. त्याच प्रमाणे हि यादी बोगस असून या यादीवर कुणीही विश्वास ठेवू नये अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. मागच्या काही दिवसात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी सोशल मीडियात व्हायरल केली होती. त्यावर औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आज उत्तर दिले आहे.

ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या लोकसभा निवडणुकी पूर्वी होणार असल्याचे परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या बदल्या करण्यासाठी आवडीची तीन ठिकाणे द्यायची होती. असा हि दावा या परिपत्रकात करण्यात आला होता. पोलीस आयुक्तांनी हे परिपत्रक बोगस असल्याचे स्पष्ट केले आहे.

हा मॅसेज कोणी व्हायरल केला याची चौकशी करण्यात येणार असून दोषी अधिकाऱ्याला निलंबित केले जाणार आहे. त्याच प्रमाणे औरंगाबाद शहरात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे काम सुसूत्र बद्ध पध्द्तीने केले जात असून या संदर्भात पोलीस महासंचालकांशी आद्यप विचार विनियम करायचा आहे. त्याच प्रमाणे या बदल्या लोकसभा निवडणुकी पूर्वी करण्यात येणार आहेत असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले आहे.