Homeताज्या बातम्याPersonal Finance | कामाची बातमी ! 1 डिसेंबरपासून होणार आहेत मोठे बदल,...

Personal Finance | कामाची बातमी ! 1 डिसेंबरपासून होणार आहेत मोठे बदल, तुमच्या खिशावर वाढणार भार; जाणून घ्या

नवी दिल्ली : Personal Finance | नोव्हेंबर महिना संपण्यास आता चार दिवस बाकी आहेत. वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर सुरू होताच अनेक बदल पहायला मिळतील, जे तुमच्या खिशावरील भार वाढवू शकतात. एकीकडे भारतीय स्टेट बँक (SBI) आपल्या ग्राहकांना झटका देणार आहे, तर दुसरकडे एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) दरात सुद्धा बदल होऊ शकतात. प्रत्येक नवीन महिन्यासोबत काही ना काही नवीन नियम सुद्धा लागू होत असतात. यावेळी लोकांच्या खिशावर कशा प्रकारे परिणाम होणार आहे ते जाणून घेवूयात. (Personal Finance)

 

SBI क्रेडिट कार्डचा वापर महागणार

तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्ड (SBI Credit Card) वापरत असाल तर तुम्हाला या बातमीने झटका बसू शकतो. आता एसबीआय कार्डने शॉपिंग करणे अवघड होऊ शकते. आता एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे करण्यात येणार EMI ट्रांजक्शनसाठी आता तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील.

 

एसबीआय कार्ड अँड पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (SBICPSL) ने ही घोषणा केली आहे की ईएमआय ट्रांजक्शनसाठी आता कार्डधारकांना 99 रुपयांची प्रोसेसिंग फी आणि त्यावर टॅक्स चुकवावा लागेल. हा नवीन नियम 1 डिसेंबर 2021 पासून लागू होईल. (Personal Finance)

 

गॅस सिलेंडरच्या दरात बदल शक्य

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला कमर्शियल आणि स्वयंपाकांच्या गॅस सिलेंडरचे नवीन दर जारी केले जातात. कंपन्या एलपीजीच्या दराच्या पुनरावलोकननंतर बदल करतात. पुनरावलोकननंतर सिलेंडरचे दर वाढतील किंवा कमी होतील हे ठरेल. यामुळे अगोदरच महागाईमुळे हतबल झालेली सामान्य जनता चिंताग्रस्त होऊन एक तारखेची वाट पहात आहे.

 

होम लोन होणार महाग, सूट बंद होणार

LIC Housing Finance ने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाचा दर कमी करून 6.66 टक्के केला आहे.
हा दर 700 किंवा त्यापेक्षा जास्त सिबिल स्कोअर असणार्‍यांसाठी आहे.
हा व्याजदर 22 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी आहे.
एलआयसी हौसिंग फायनान्सची ही ऑफर येत्या 30 नोव्हेंबरला संपत आहे.

 

UAN सोबत आधार लिंक केले नाही तर तोटा

युनिव्हर्सल अकाऊंट नंबर म्हणजे UAN आधार नंबर (Aadhaar) सोबत संलग्न करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे.
Aadhaar आणि UAN लिंकिंग जर 1 डिसेंबरपूर्वी केले नाही तर EPFO मेंबर्सचे मोठे नुकसान होऊ शकते.

 

Web Title :- Personal Finance | big changes happen from december 1 burden on your pocket will increase end of the year marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News