PPF अकाऊंट बंद झालं असेल तर पुन्हा ‘या’ पध्दतीनं करा अॅक्टीव्ह, नाही होणार कोणतंही नुकसान, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्त संस्था – पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) स्कीम छोटी बचत जमा करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून निवृत्तीनंतर चांगले रिटर्न मिळू शकते. यामध्ये वार्षिक कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. सोबतच इन्कम टॅक्स सेक्शन 80सी अंतर्गत टॅक्समधून सूट सुद्धा मिळते. तिचा लॉक इन पीरियड 15 वर्षांचा असतो. यामध्ये प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 500 रुपये गुंतवणे आवश्यक आहे.
जर तुम्ही किमान 500 रुपये एका आर्थिक वर्षात भरू शकला नाहीत, तर तुमचे अकाऊंट डिअॅक्टिव्हेट होते. अशावेळी जर तुमचे अकाऊंट बंद झाले असेल आणि तुम्हाला ते पुन्हा डिअॅक्टिव्हेट करायचे असेल तर जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…
अशी आहे प्रक्रिया
1 सर्वप्रथम तुमचे जेथे पीपीएफ अकाऊंट आहे तेथे लेखी अर्ज द्यावा लागेल. हा अर्ज तुम्ही अकाऊंट उघडल्यापासून 15 वर्षाच्या कालावधीत कधीही देऊ शकता.
2 जोपर्यंत अकाऊंट अॅक्टिव्ह नव्हते, त्या कालावधीतील प्रत्येक आर्थिक वर्षाच्या हिशेबाने 500 रुपये जमा करावे लागतील. हे पैसे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चेकद्वारे जमा करावे लागतील.
3 तुमचे अकाऊंट रिव्हाइव्ह करण्यासाठी 50 रुपये पनल्टी भरावी लागते. थकीत रक्कम भरताना ही पेनल्टी सुद्धा द्यावी लागेल.
4 अर्ज जमा केल्यानंतर बँक किंवा पोस्ट ऑफिस तुमच्या अॅप्लीकेशनची पडताळणी करते. जर जमा रक्कमेचा कालावधी 15 वर्ष पूर्ण झाला असेल तर हे अकाऊंट पुन्हा अॅक्टिव्ह करता येत नाही. जर 15 वर्ष पूर्ण झाली नसतील तर पेनल्टी भरल्यानंतर ते अॅक्टिव्ह केले जाते.