LIC New Jeevan Shanti Policy | एकदाच करा गुंतवणूक, निवृत्तीनंतर भासणार नाही पैशांची चणचण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एलआयसी न्यू जीवन शांती पॉलिसी LIC New Jeevan Shanti Policy एक प्रकारची पेन्शन पॉलिसी Pension Policy आहे. ज्यामध्ये व्यक्तीला केवळ एकदाच प्रीमियम भरावा लागतो. ज्यानंतर जीवनभर पेन्शन जारी राहते. म्हणजे रिटायर्मेंटनंतर retirement तुम्हाला पैशांची चणचण भासणार नाही. तुम्ही सहजपणे खर्च करू शकता, कुणावरही अवलंबून राहणार नाही. विशेष म्हणजे या पॉलिसीत तुम्हाला दोन ऑपशन मिळतात. पहिला ऑपशन इमिजिएट अंतर्गत पॉलिसी घेतल्यानंतर ताबडतोब पेन्शन सुविधा मिळते.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

तर दुसरा ऑपशन आहे डेफ्फर्ड एन्युटी. ज्या अंतर्गत तुम्ही एकदा पैसे Money जमा केल्यानंतर 5,10,15 किंवा 20 वर्षानंतर सुद्धा पेन्शनच्या सुविधेचा लाभ घेऊ शकता. उदाहरण समजून घ्यायचे तर जर तुम्ही 40 वर्षाच्या वायात एकरकमी 10 लाख रुपयांचा प्रीमियम भरला तर ताबडतोब पेन्शन मिळवू शकता किंवा 5, 10, 15 किंवा 20 वर्षानंतर सुविधा घेऊ शकता.

गुंतवणुकीच्या हिशेबाने मिळते पेन्शन :
तशी या योजनेत पेन्शनची रक्कम निश्चित नाही.
ती तुम्ही एकदा भरलेला प्रीमियम, वय आणि डिफर्मेंट पीरियडवर अवलंबून असते.
गुंतवणूक Investment आणि पेन्शन सुरूहोण्याच्या दरम्यानचा कालावधी जेवढा जास्त असेल किंवा वय जेवढे जास्त असेल पेन्शन सुद्धा तेवढीच मिळेल.
उदाहरणार्थ जर तुम्ही 10 लाखाच्या गुंतवणुकीवर 5 वर्षानंतर पेन्शन सुरू केली तर तुम्हाला 9.18 टक्के रिटर्नच्या हिशेबाने एका वर्षात 91800 रुपये पेन्शन मिळेल.

कोण करू शकते सुरूवात आणि कशी :
एलआयसीच्या या योजनेची सुरूवात किमान 30 वर्ष आणि कमाल 85 वर्षापर्यंत करता येऊ शकते.
जीवन शांती प्लॅनमध्ये लोन Loan, पेन्शन सुरू झाल्याच्या 1 वर्षानंतर आणि ती सरेंडर,
पेंशन सुरू होण्याच्या 3 महिन्यानंतर केले जाऊ शकते.
ही पॉलिसी ऑनलाईन आणि ऑफलाइन खरेदी करता येते.
5 ते 20 वर्षाच्या अंतरावर वेगवेगळ्या पेन्शन प्लॅन Pension Plan अंतर्गत जीवन शांती प्लॅनमध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही 8.79 ते 21.6 टक्के वार्षिक हिशेबाने व्याज मिळते.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : personal finance lic new jeevan shanti policy invest once no shortage of money on retirement

हे देखील वाचा

Five Police Officer Suspended | दोन पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस तडकाफडकी निलंबित; केली होती महाराष्ट्रातील भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीर तपासणी

Petrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले पेट्रोल-डिझेल, परभणीत पेट्रोल 104.52 रूपये, जाणून घ्या राज्यातील इतर शहरातील दर

Learning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळेल परवाना