फायद्याची गोष्ट ! पोस्ट ऑफिसची ही स्कीम बँक FD पेक्षाही ‘लाभ’दायक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्याकडे पैसे असल्यास आणि गुंतवणूक करुन आपल्याला अधिक नफा मिळवायचा असेल तर आपण पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट अकाउंट योजनेत गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट अकाउंटमध्ये बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा अधिक रिटर्न मिळत आहेत. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय 7 दिवस ते 5 वर्षांच्या एफडीवर 6.4 टक्के व्याज देत आहे. अशा परिस्थितीत बँक एफडीपेक्षा चांगला पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट (पीओटीडी), जेथे 5 वर्षांच्या ठेवींवर 6.7% व्याज मिळते.

व्याज दर कपात
एप्रिल ते जून या तिमाहीत सरकारने छोट्या बचत योजनांमध्ये कपात केली आहे. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत व्याजदरात 1 टक्क्यांनी कपात झाली आहे. पाच वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवरील व्याज कमी करण्यात आले असून ते आतापर्यंत 7.7 टक्के होते. त्याचबरोबर, एका वर्षापासून ते 3 वर्षांच्या कालावधीत 5.5 टक्के व्याज मिळते. या ठेवींवर प्रत्येक तिमाहीत व्याज दिले जाते.

5 लाखांच्या ठेवीवर 1.69 लाखांचा नफा
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षाच्या कालावधीसाठी टाइम डिपॉजिट योजनेत 5 लाख रुपये जमा केले तर त्याला वार्षिक 6.7 टक्के कंपाउंडिंग दराने व्याज मिळेल. ही रक्कम मॅच्युरिटीनंतर 6,69,113 रुपयांवर जाईल. म्हणजेच ठेवीवर तुम्हाला 1.69 लाखांचे व्याज मिळेल. मॅच्युरिटी रक्कम 3 वर्षाच्या ठेवीवर 5.78 लाख रुपये, 2 वर्षाच्या ठेवीवर 5.51 लाख रुपये आणि 1 वर्षाच्या ठेवीवर 5.25 लाख रुपये असेल. तसेच आपण आपल्या पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात वार्षिक व्याज ट्रान्स्फर करू शकता. याचा फायदा म्हणजे येथे ठेवींवरही तुम्हाला वार्षिक 4 टक्के दराने व्याज मिळेल. ही सुविधा 2, 3 किंवा 5 वर्षांच्या पीओटीडीसह येते.

या योजनेचे वैशिष्ट्य
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये आपली 100 टक्के गुंतवणूक सुरक्षेची हमी देते. एका पोस्ट ऑफिसमध्ये किमान 1000 रुपयांसह टाइम डिपॉझिट खाते उघडता येते. जास्तीत जास्त रक्कम जमा करण्याची मर्यादा नाही. यात एकल आणि संयुक्त खात्याची सुविधा आहे. जर 10 वर्षांपेक्षा जास्त वय असेल तर त्या खात्यातसुद्धा अल्पवयीन मुलीच्या नावावर खाते उघडले जाते आणि वयस्क होईपर्यंत पालकांनी त्याची काळजी घ्यावी लागते. योजनेंतर्गत शक्य तितकी खाती उघडली जातील.

मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढण्याची सुविधा
मॅच्युरिटी होण्याआधी टाइम डिपॉझिट धारकाला आपत्कालीन परिस्थितीत आपला निधी परत मिळू शकतो. दरम्यान, यासाठी खात्यात प्रथम ठेव 6 महिन्यांसाठी पूर्ण करावी. या योजनेत 5 वर्षांसाठी केलेली गुंतवणूक कर लाभास पात्र आहे आणि प्राप्तिकर अधिनियम 1961 च्या कलम 80 सी अंतर्गत सूट मिळू शकते. खाते उघडण्याच्या वेळी किंवा नंतर नामांकन करण्याची सुविधा देखील आहे.