RBI ची हमखास नफ्याची स्कीम : प्रत्येक 6 महिन्याला येतील पैसे, 1000 रुपयांनी करा सुरूवात, जाणून घ्या

नवी दिल्ली : कोरोना संकट काळातील खराब आर्थिक वातावरणात आरबीआयचे फ्लोटिंग रेट सेव्हिंग्स बॉन्ड्स त्या लोकांसाठी सुरक्षित गुंतवणूक पर्याय ठरू शकतात, ज्यांना नियमित उत्पन्न हवे आहे. केंद्रीय बँकेने 7.75 टक्के फिक्स्ड इंटरेस्ट रेट वाले बॉन्ड्स बंद केल्यानंतर फ्लोटिंग रेट सेव्हिंग्स बॉन्ड्स सादर केले आहेत. यातील गुंतवणूकीवर 7.15 टक्केचे गॅरंटेड रिटर्न मिळेल. यामध्ये कुणीही व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब गुंतवणूक करू शकतात. फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉन्ड्समध्ये मुळ भारतीय वंशाचे परदेशी लोक आणि एनआरआय गुंतवणूक करू शकत नाहीत.

7 वर्षांचा लॉक-इन पीरियड, मुलांच्या नावे करा गुंतवणूक
कोणीही भरतीय नागरिक पालक म्हणून अल्पवयीन मुलांच्या नावावर सुद्धा बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करू शकतात. संयुक्त प्रकारे सुद्धा यामध्ये गुंतवणूक करता येते. भारतीय नागरिक किमान 1,000 रुपयांपासून गुंतवणूकीला सुरूवात करू शकतात. कमाल गुंतवणुकीची मर्यादा यामध्ये नाही. बॉन्ड्समध्ये गुंतवणुकीचा लॉक-इन पीरियड 7 वर्षांचा आहे म्हणजे तुम्ही या कालावधीपर्यंत पैसे काढू शकत नाही.

सहामाहीच्या आधारावर व्याज
आरबीआयच्या या बॉन्ड्सवर सहामाहीच्या आधारावर व्याज देण्यात येईल. याचे पहिले पैसे 1 जानेवारी 2021 ला मिळतील. व्याजदर प्रत्येक 6 महिन्याला ठरवले जातात. व्याजदरात पहिला बदल 1 जोनवारी 2021 ला केला जाईल. आता केलेल्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला 1 जानेवारी 2021 ला 7.15 टक्के व्याज प्राप्त होईल. आरबीआय 7.75 टक्के फिक्स्ड इंटरेस्ट रेट बॉन्ड्सप्रमाणे फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉन्ड्ससाठी मॅच्युरिटीच्या वेळी कम्युलॅटिव्ह इंटरेस्ट मिळवण्याचा कोणताही पर्याय यात नाही.

इन्कम टॅक्समध्ये सूट नाही, कापला जाईल टीडीएस
फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉन्ड्समध्ये इन्कम टॅक्स मिळणार नाही. हे उत्पन्नर पूर्णपणे टॅक्सेबल असेल. या बॉन्ड्सच्या व्याजातून होणार्‍या उत्पन्नावर पूर्ण टॅक्स भरावा लागेल. व्याज उत्पन्नावर टीडीएस सुद्धा कापला जाईल. या बॉन्ड्ससाठी कोणतीही सरकारी बँक किंवा आयसीआयसीआई, एचडीएफसी आणि अ‍ॅक्सिस बँकेत अर्ज करू शकता. ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता. बॉन्ड्समध्ये 20,000 रूपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

हे गुंतवणूकदार मॅच्युरिटीपूर्वी काढू शकत नाही पैसे
आरबीआयच्या बॉन्ड्ससाठी अर्ज करताना बँक अकाऊंट डिटेल्स द्यावे लागतील, जेणेकरून व्याज थेट खात्यात जाईल. यामध्ये 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढण्यास पात्र नाहीत. 60 आणि 70 वयाच्या दरम्यानच्या लोकांना सहा वर्षानंतर रोख रक्कम काढण्याची परवानगी आहे. याशिवाय 70 ते 80 वयाच्या लोकांसाठी पाच वर्षानंतर आणि 80 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना चार वर्षानंतर रोखीची परवानगी आहे. जॉईंट इन्व्हेस्टमेंट होल्डर्समध्ये एखाद्याचे किंवा सर्वांचे निधन झाल्यास कोणत्याही व्यक्तीला पैसे मिळवण्यासाठी नॉमिनेट करण्याचा पर्याय आहे. यामध्ये अनेक लोकांना नॉमिनेट करण्याचा पर्याय आहे.