Personal Loan | कामाची बातमी ! पहिल्यांदा घेत असाल पर्सनल लोन तर ‘या’ 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Personal Loan | बँका आणि इतर वित्तीय संस्थांनी पर्सनल लोन (Personal Loan) च्या व्याजदरात बदल केले आहेत. पर्सनल लोन घेणे सोपे आहे. कारण त्यासाठी सोने आणि गृहकर्ज यांसारखे कोणतेही तारण किंवा सुरक्षा जमा करण्याची आवश्यकता नाही. याशिवाय इतर कर्जाच्या तुलनेत पर्सनल लोन कोणत्याही कारणासाठी वापरले जाऊ शकते.

 

घराच्या नूतनीकरणासाठी किंवा अचानक आलेल्या वैद्यकीय खर्चासाठी पर्सनल लोनची गरज भासू शकते, आर्थिक संकटाच्या काळात, तुमच्याकडे तारण ठेवण्यासाठी काहीही नसताना हा एक चांगला पर्याय ठरतो. तुम्ही पहिल्यांदाच वैयक्तिक कर्ज घेणार असाल तर, या पाच गोष्टी लक्षात ठेवा (five key pointers for personal loan).

 

परतफेड करता येईल एवढेच कर्ज घ्या
परतफेडीच्या क्षमतेवर आधारित प्री-अ‍ॅप्रुव्हड कर्ज देखील बँका देतात. यासाठी कमी कागदपत्रे लागतात, त्यामुळे ते आकर्षक वाटते. मात्र, या आधारावर खूप जास्त पर्सनल लोन घेऊ नका, तेवढेच कर्ज घ्या, जे सहज फेडता येईल. कर्जाची रक्कम ठरवताना, एचख विचारात घ्या जेणेकरून तो आर्थिक उद्दिष्टांमध्ये अडथळा निर्माण करणार नाही.

 

पेमेंट टर्म लक्षात ठेवा
पेमेंट टर्म देखील लक्षात ठेवा. जर तुम्ही कर्ज परतफेडीचा कालावधी जास्त ठेवला तर अशा स्थितीत ईएमआय कमी असेल, पण व्याज जास्त असेल.

किमान व्याजदर निवडा
पर्सनल लोनचे दर इतर कर्जांच्या तुलनेत जास्त आहेत कारण त्यात जास्त जोखीम असते. त्याचा दर 9 टक्के ते 24 टक्क्यांपर्यंत आहे. व्याजदर जितका जास्त असेल तितका भरावा लागणारा EMI जास्त असेल. त्यामुळे सर्वात कमी व्याजदर असलेले पर्सनल लोन घ्या.

 

या अटी देखील जाणून घ्या
साधारणपणे 21 ते 65 वयोगटातील लोक पर्सनल लोन घेऊ शकतात. यासाठी किमान मासिक उत्पन्न (निव्वळ) रुपये 15,000 ते 30,000 दरम्यान असावे. कर्जदाराचा किमान कामाचा अनुभव सध्याच्या नोकरीमध्ये एक वर्षाचा किंवा एकूण दोन वर्षांचा असावा. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हला स्वस्त आणि सुलभ कर्ज मिळेल. पगारदार आणि स्वयंरोजगार असलेल्या लोकांसाठी व्याजदर भिन्न आहे.

 

वेळेवर पैसे भरा, नाहीतर भविष्यात येतील अडचणी
कोणत्याही प्रकारच्या कर्जाची, विशेषतः पर्सनल लोनची वेळेवर परतफेड करा.
असे करण्यात अयशस्वी झाल्यास केवळ तुमच्या क्रेडिट स्कोअरलाच हानी पोहोचणार नाही तर भविष्यात तुमच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम होईल.
कर्जाची आवश्यकता तुमच्या परतफेडीच्या क्षमतेपेक्षा कमी ठेवा. EMI भरताना आर्थिक भार वाढणार नाही. (Personal Loan)

 

– आदिल शेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी, बँकबाजार.

 

 

Web Title :- Personal Loan | taking personal loan for the first time keep five things in mind

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Lata Mangeshkar | ‘ लता दीदीसाठी घरात शिव रुद्र स्थापित केलं आहे, पूजा-पाठ केले जात आहेत’ – आशा भोसले

 

Pune Crime | पुण्याच्या मार्केटयार्डमधून कांद्याचे पोते चोरणार्‍यास अटक

 

Tesla Plant In India | टेस्लाला आकर्षित करण्यासाठी गुंतली अनेक राज्ये ! महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, तेलंगणा आणि पंजाब यांनी प्लांट उभारण्यासाठी दिलं आमंत्रण