ओमराजे की राणादादा ….पैज लावणे पडले महागात, दोघांना बेड्या

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीच्या काळात आपल्या उमेदवारावर एक्स्ट्रा कॉन्फिडन्स दाखवणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. ओमराजे निंबाळकर की राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवडून येणार असल्याची चारचाकी व दुचाकी वाहनांची पैज लावून चक्क १०० रुपयांच्या बॉंड पेपरवर करार केल्याच्या बातम्या वर्तमान पत्रात आल्यानंतर दोघेही राज्यात चर्चेत आले होते. त्यानंतर पोलिसांनी याची दखल घेत जुगाराचा गुन्हा दाखल करून पैजा लावणाऱ्यांना अटक केली आहे. अशाच प्रकारे पैज लावणाऱ्यांवर सांगली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात लढत होती. यावेळी दोघांचेही कार्यकर्ते कोण निवडून येणार याबाबत चांगलेच कॉन्फिडन्ट आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थक असलेल्या तरुणांनी चक्क दुचाकी आणि चारचाकीच्या पैजा लावल्या.

बाजीराव विष्णू करवर (रा. राघुचीवाडी, ता. जि. उस्मानाबाद), शंकर विठ्ठल मोरे (रा.राघुची वाडी ता. जि. उस्मानाबाद), हनुमंत पाराप्पा ननवरे आणि जीवन अमृतराव शिंदे (दोघेही रा. घाटंग्री ता. जि. उस्मानाबाद) यांनी पैजा लावल्या होत्या. त्यांनी आपल्या मतदारसंघातून हाच उमेदवार निवडून येणार या कॉन्फिडन्समध्ये चक्क १०० रुपयांच्या बॉन्ड पेपरवर लिहून घेत पैज लावली होती.

चारचाकी आणि दुचाकीवर ही पैज लावण्यात आली. परंतु ती लावणे कारयद्याप्रमाणे गुन्हा आहे. म्हणून त्यांच्याविरोदात आंदनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.