Pervez Musharraf Passes Away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दुबई : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन (Pervez Musharraf Passes Away) झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून परवेज मुशर्रफ हे आजारपणामुळे त्रस्त होते. त्यांच्यावर दुबई (Dubai) येथील एका रूग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, आज अचानक त्यांची प्रकृती खालावली, आणि त्यांचे त्यात निधन झाले. अशी बातमी पाकिस्तानी माध्यमांच्या रिपोर्टनुसार समोर येत आहे. त्यांच्यावर २०१६ पासून दुबई येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. (Pervez Musharraf Passes Away)

 

दरम्यान, कारगील युध्दामध्ये पाकिस्तानची आगळीक जनरल मुशर्रफ यांच्याकडून करण्यात आली होती. माजी जनरल परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असताना बंड करून सत्ता मिळविली होती. त्यांनी ३ नोव्हेंबर २००७ रोजी संविधान भंग करून पाकिस्तानात आणिबाणी जाहीर केली. त्यानंतर याप्रकरणी त्यांच्यावर २०१३ मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 

जनरल परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf Passes Away) यांना त्याप्रकरणी फाशीची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी राष्ट्राध्यक्षांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पेशावर येथील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

 

मात्र, पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्या फाशीची शिक्षा लाहोर उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली होती. देशद्रोहाच्या आरोपात इस्लामाबादच्या विशेष न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. विशेष न्यायालयाने दिलेला निर्णय असंवैधानिक असल्याचं लाहोर उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. मुशर्रफ यांनी त्यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला लाहोर उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं.

 

असंवैधानिक पध्दतीने देशात आणीबाणी लागू केल्यानंतर परवेज मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुशर्रफ यांच्यावर डिसेंबर २०१३ मध्ये ३ नोव्हेंबर २००७ रोजी देशात आणीबाणी लागू केल्याबद्दल आणि डिसेंबर २००७ च्या मध्यापर्यंत राज्यघटना निलंबित केल्याचा आरोप होता. याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३१ मार्च २०१४ रोजी मुशर्रफ यांना दोषी ठरवण्यात आले होते. मुशर्रफ यांनी १९९९ ते २००८ या कालावधीत त्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख म्हणून कारभार सांभाळला.

जनरल परवेज मुशर्रफ यांनी ऑक्टोबर १९९९ मध्ये लष्करी बंड करून पाकिस्तानची सत्ता काबीज केली होती.
मुशर्रफ २००१ ते २००८ पर्यंत पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते.
परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तान संविधान भंग करत नवाज शरीफ यांचं सरकार उलथवून सत्ता काबीज केली होती.
पाकिस्तानच्या इतिहासातील हे पहिलं प्रकरण आहे,
ज्यात एखाद्या माजी लष्कर प्रमुखावर देशद्रोहाच्या आरोपात नागरी कोर्टात खटला चालवण्यात आला.
त्यामुळे हे प्रकरण जगभर गाजले होते.

 

 

 

Web Title :- Pervez Musharraf Passes Away | former president of pakistan general
pervez musharraf passes away after a prolonged illness

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा