Pervez Musharraf Passes Away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Pervez Musharraf Passes Away |  पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष (Pakistan Former President) परवेज मुशर्रफ यांचं शुक्रवारी (दि.10) निधन झाल्याचे वृत्त समोर आलं आहे. बऱ्याच काळापासून पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेज मुशर्रफ (वय – 78) यांची प्रकृती खालावली होती. पाकिस्तानच्या मीडिया नुसार त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथे त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर (Ventilator Support) ठेवण्यात आलं होतं. अखेर उपचारादरम्यान त्यांचे निधन (Pervez Musharraf Passes Away) झाले.

 

परवेझ मुशर्रफ हे 2001 – 2008 या कालावधीत पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. याशिवाय ते पाकिस्तानचे आर्मी प्रमुख ही (Pakistan Army Chief) होते. भारताविरुद्ध झालेल्या कारगिल युद्धासाठी (Kargil War) मुशर्रफ यांना जबाबदार धरलं जातं. मुशर्रफ मार्च 2016 पासून दुबईत (Dubai) राहत होते. दरम्यान एका टिव्ही चॅनेलने दावा केला आहे की, मुशर्रफ यांना हृदयाशी संबंधीत आणि इतर आजार होते. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. (Pervez Musharraf Passes Away)

 

पाकिस्तानचे पूर्व राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा (Death Penalty) सुनावण्यात आली होती. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच पेशावर हाय कोर्टाचे (Peshawar High Court) चीफ जस्टिस वकार अहमद सेठ (Chief Justice Waqar Ahmed Seth) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय समितीने मुशर्रफ यांना 3 नोव्हेंबर 2007 मध्ये देशात आणीबाणी (Emergency) लागू करणे आणि डिसेंबर 2007 च्या मध्यापर्यंत संविधान निलंबित (Constitution Suspended) केल्याच्या गुन्ह्यात डिसेंबर 2013 मध्ये देशद्रोहाचा गुन्हा (Crime of Treason) दाखल करण्यात आला. 31 मार्च 2014 मध्ये मुशर्रफ यांना दोषी ठरवण्यात आले होते.

 

Web Title :-  Pervez Musharraf Passes Away | pakistan pervez musharraf passes away

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा