निपाह व्हायरस वरील ‘प्राजक्त ‘ उपचार

वृत्तसंस्था :

निपाह व्हायरस ने केरळ राज्यात १३ जणांचा जीव घेतला वेगाने फोफावणाऱ्या या रोगाबद्दल अजूनही कोणतीही लस किंवा औषध नाही. पण या व्हायरस वर पारिजातकाची पाने गुणकारी असल्याचा संदेश सध्या व्हॉट्स अँप वर सर्वात जास्त वाचला जात आहे. सिद्ध उपचार पद्धतीनुसार पारिजातकांच्या पानांचा काढा यावर हमखास गुणकारी असल्याचे या मेजेसमध्ये दिले आहे.

काय आहे उपचार?
निपाह व्हायरसची लागण झालेल्या रुग्णास द्यावयाचा काढा बनवण्याची पद्धत या मेसेजमध्ये दिली आहे. तीनुसार, २०० मि.ली. पाण्यात पारिजातकाच्या झाडाची पूर्ण वाढ झालेली मूठभर पाने बारीक करून व स्वच्छ धुवून टाकावीत. हे पाणी १०० मि.ली. उरेपर्यंत आटवावे. त्यात दोन काळे मिरे ठेचून टाकावे. पाणी थोडे कोमट झाल्यावर त्यात लिंबाच्या रसाचे तीन थेंब टाकावेत. हा काढा दिवसातून तीनदा घ्यावा. निपाह व्हायसरसारख्या आजारांवर तो हमखास गुणकारी ठरतो. निपाह व्हायरससारख्या आजारांचा उल्लेख सिद्ध उपचार पद्धतीत आढळून येतो म्हणजेच हे आजार फार प्राचीन काळीही भेडसावत होते असाच यातून अर्थ काढता येऊ शकेल.