सोनू सूद आणि श्रद्धा कपूर ठरले 2020 मधील ‘हॉटेस्ट व्हेजिटेरियन’ ! PETA नं केला गौरव

पोलीसनामा ऑनलाईन टीम  –   बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) हे 2020 मधील भारतातील हॉटेस्ट व्हेजिटेरियन सेलिब्रिटी (PETA – 2020 Hottest Vegetarians) असल्याचं पेटा (PETA) नं घोषित केलं आहे.

पेटानं म्हटलं आहे की, श्रद्धा कपूर आणि सोनू सूद दोघंही न्यू नॉर्मलमध्ये चाहत्यांना शाकाहार करण्यासाठी प्रेरीत करत आहेत. त्यामुळं यावर्षीचा पुरस्कार त्यांना दोघांना देण्यात आला आहे.

आजवर या लोकांचा पेटानं झालाय गौरव

पेटानं यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, मानुषी छिल्लर, सुनील छेत्री, अनुष्का शर्मा, कार्तिक आर्यन, विद्युत जामवाल, कंगना रणौत, शाहिद कपूर आणि रेखा यांचाही हॉटेस्ट व्हेजिटेरियन म्हणून गौरव केला आहे.

बॉलिवूड स्टार आमिर खान देखील शाकाहार घेतो. मीडिया रिपोर्टनुसार आधी तो मांसाहार करत असे परंतु काही वर्षांपूर्वी मात्र त्यानं शाकाहारी खाणं सुरू केलं आहे. बॉलिवूड स्टार विद्युत जामवाल हा देखील आपल्या फिटनेस आणि बॉडी कटींगसाठी फेमस आहे. तोदेखील शाकाहारी आहे. शाकाहारी डाएटनंच त्यानं ही शरीरयष्टी कमावली आहे.

https://www.instagram.com/p/Bw5wH_6hj3k/?utm_source=ig_embed