विराट कोहलीसोबत Live आल्यानंतर पीटरसनचा आरोप, म्हणाला – ‘पत्नी अनुष्काच्या सांगण्यावरून व्हिडीओ संपवला’

पोलीसनामा ऑनलाईन :टीम इ़ंडियाचा कॅप्टन विराट कोहली इंग्लंडचा माजी क्रिकेटर पीटरसनसोबत गुरुवारी लाईव आला. दोघांनीही करिअर, सद्यस्थिती यावर बातचित केली. दोघांमध्ये खूप चर्चा झाली. अनेक चाहत्यांनीही यावर कमेंट केली. व्हिडीओ संपल्यानंतर पीटरसननं कोहलीला गंमतीशीर अंदाजात ट्रोल करत म्हटलं की, तो पत्नी आणि अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा हिच्या सांगण्यावरून लाईव्ह संपवून निघून गेला.

https://www.instagram.com/p/B-e9cpyFw2S/?utm_source=ig_embed

अनुष्काची कमेंट व्हायरल

या लाईव्हनंतर पीटरनसननं त्याच्या इंस्टावर व्हिडीओचा स्क्रिनशॉट शेअर केला. ज्यावर अनुष्का शर्माचीही कमेंट आली होती. अनुष्कानं लिहिलं की, “चला चला डिनर टाईम.” हा एका इशाराच होता की, ती विराटला व्हिडीओ संपवण्यासाठी म्हणत होती. पीटरसनच्या मते कोहलीनं जशी ती कमेंट वाचली त्यानंतर व्हिडीओ संपला. हा स्क्रिनशॉट शेअर करताना कॅप्शनमध्ये विराट म्हणतो, “जेव्हा बॉस म्हणतो तुमची वेळ सपंली तर मग संपली. अनुष्का-विराट आशा आहे तुम्हालाही मजा आली असावी. दोन मित्र फक्त काही काळ सोबत घालवत होते.

https://www.instagram.com/p/B-bVSgSpSgM/

विराटनं केलं लॉकडाऊनवर भाष्य

लॉकडाऊनवर बोलताना विराट म्हणाला, “हे खूप अवघड आणि आव्हानात्मक आहे. आम्ही यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत.”

https://www.instagram.com/p/B-gV8ShpsjA/

दीर्घकाळानंतर आता अनुष्कासोबत एकत्र टाईम स्पेंड करायला मिळणं विचित्र आहे असं सांगताना विराट म्हणतो, “आम्ही दीर्घकाळापासून कधी एकाच जागेवर नाही राहिलो. हे खूप विचित्र आहे.”

https://www.instagram.com/p/B-gUB0JpYSh/

https://www.instagram.com/p/B-er3FQnp8v/