पुणे : ग्राहक पेठेत डल्ला मारणारा चोरटा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील टिळक रॉड येथे असणाऱ्या प्रसिद्ध ग्राहक पेठेत चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आता पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

आठ दिवसांपूर्वी ग्राहक पेठ या दुकानात एका अज्ञात इसमाने चोरी केली होती. याबाबतीत पोलिसांनी दीपक कृष्णा कुटुम (२४) याला अटक केली आहे. चौकशीनंतर आरोपीने आणखी आठ दुकानात चोरी केल्याची कबुली दिली आहे. ग्राहक पेठेत २ लाख २९ हजारांचा माल चोरी करून आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मिळाल्या माहितीनुसार, आरोपी मूळचा आसामचा रहिवासी आहे. दहा वर्षापूर्वी तो कामाकरिता मुंबईत आला होता. मुंबईत देखील त्याने १८ ते २० दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे. याआधी मुंबईतील दादर, सीएसटी, बांद्रा, बोरिवली, गोरेगाव येथे त्याने चोरी केली आहे. इतकेच नव्हे तर तो मुंबईहून चोरीसाठी पुण्यात आला होता. चोरीचा माल आरोपीने कुठे लपवला आहे. याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपीला ७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई पुणे पोलीस उपायुक्त बसवराज तेली, सहायक पुलिस आयुक्त किशोर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली . ही कारवाई खडकी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पुलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पुलिस निरीक्षक संभाजी शिर्के व डीबी टीम चे पुलिस उप निरीक्षक संजय गायकवाड, अनंत व्यवहारे, पोलीस कर्मचारी विजय कांबले, संदीप कांबले, अशिष चव्हाण, समीर मालवदकर, विनोद जाधव, गणेश माली, राकेश क्षीरसागर, रवींद्र लोखंडे यांनी केली.