घरखरेदी प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांवर याचिका दाखल, ‘दबाव’ आणत असल्याचा आरोप

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट रोजी संपणार होता. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली असून आता ते नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात निवृत्त होतील. मात्र एकीकडे त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली असताना दुसरीकडे त्यांच्यावर फसवणुक प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त संजय बर्वे आणि त्यांच्या पत्नीवर मुंबईत पाच वर्षांपूर्वी दोन सदनिकांच्या खरेदी प्रकरणात याचिका दाखल करण्यात आली आहे. यानंतर आता या प्रकरणाची 4 सप्टेंबरला सुनावणी होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बांधकाम व्यावसायिक मोहम्मद सिद्दीकी यांनी हि याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत कि, जोगेश्वरीतील मजासवाडी येथे या दाम्पत्याने दोन सदनिका खरेदी केल्या होत्या. मात्र काही दिवसांनंतर त्यांनी या सदनिका विकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या व्यवहारात आपल्यावर ते दबाव टाकत असल्याचा आरोप याचिकाकर्त्याने याचिकेत केला आहे.

दरम्यान, या प्रकरणात माहिती घेऊन राज्य सरकारने याचा खुलासा करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना देखील या प्रकरणात निवेदन देण्यात आल्याची माहिती याचिकाकर्त्याने दिली आहे. तसेच कोर्टात यासंबंधी काही पुरावे देखील सादर करण्यात आले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –