‘या’ कारणामुळं अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या ‘छपाक’विरोधात उच्च न्यायालयात याचिका !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणच्या छपाक सिनेमाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेद्वारे सिनेमाच्या प्रदर्शनावर स्थगितीची मागणी केली जात आहे. एका लेखकानं आरोप केला आहे की, फॉक्स स्टारनं त्यांची कथा चोरली आहे. त्यांनी या प्रकरणी हायकोर्टात धाव घेतली आहे.

याचिकाकर्ते लेखक राकेश भारती यांनी दावा केला आहे की, त्यांच्या ब्लॅक डे या नोंदणीकृत कथेची चोरी करून छपाक सिनेमा बनवला गेला आहे. ज्येष्ठ वकिल अशोक सरोगी यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. सरोगी यांनी याबाबत बोलताना सांगितलं आहे की, या याचिकेवर सुट्टीकालीन खंडपीठ 27 डिसेंबर रोजी सुनावणी घेणार आहे.

छपाक सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. 2 मिनिट 19 सेकंदाच्या ट्रेलरनं प्रेक्षक भावूक तर झाले होते. हा सिनेमा पुढील वर्षी 10 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. विक्रांत मेस्सी दीपिकासोबत प्रमुख भूमिकेत आहे. लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे ज्यांच्यावर अ‍ॅसिड हल्ला झाला होता. यातून त्या वाचल्या आहेत. सिनेमात त्यांचा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/