‘या’ धोक्यामुळे भारतात 5G चाचणीवर बंदीची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात प्रथम २ G ३ G, ४ G आता सध्या येणारं ५ G इंटरनेट यावर अनेक लोक उत्सुकतेने बघत असताना सुद्धा ५ G इंटरनेट टॉवर टेस्टिंगवर (चाचणी करण्यावर) बंदी घालण्याची मागणी केली गेली आहे. यावरून आता सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली गेली आहे. याबाबत वकील ए. पी. सिंह यांनी न्यायालयात अर्ज दाखल केले आहे. तर भारतात ५ जी इनरनेट नेटवर्क अधिक धोकादायक असल्याचा दावा या याचिकेमधून करण्यात आला आहे.

५ G इंटरनेट गुप्ततेसाठी हे अधिक धोकादायक आणि एक मोठे संकट आहे. वापरकर्त्याचा डेटा कुणीही सहज हॅक करू शकतो. याबरोबरच नेदरलँडमध्ये टेस्ट दरम्यान, कित्येक शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच, हेग शहरात ५ G इंटरनेट नेटवर्क टेस्ट दरम्यान सुमारे ३०० पक्षी मृत्युमुखी पडले आहेत. तसेच, २०१८ रोजी चिनी कंपनी हुवावेने गुरूग्राम, हरियाणा त ५ G इंटरनेटची टेस्ट केली होती. तेव्हा ज्यामध्ये सांगण्यात आलं होतं की, ५ G नेटवर्कच्या तंत्रज्ञानात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा उपयोग केला जातो आहे. तर यामध्ये कर्करोगाचा धोका मोठा वाढतो. तर गर्भावस्थे वेळी मोबाइल विकिरणने महिलाबरोबर छोट्या मुलांवर देखील याचा परिणाम होतो. तसेच, ५ G नेटवर्क हे दहशतवाद्यांना मदत होईल. तर भारताची सुरक्षितता धोक्यात येऊ शकणार असे या दाखल केलेल्या याचिकेमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

या दरम्यान, टेलिकॉम कंपन्या आता ५ G चाचण्यांवर अधिक भर देत आहे. Airtel, Reliance Jio, आणि Vodafone – Idea याबरोबरच चाचण्यांवर कार्य करीत आहे. Jio कडून नुकतेच ५७ हजार १२३ कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी करण्यात आले आहेत. म्हणून कंपनीने २२ सर्कलमध्ये स्पेक्ट्रम खरेदी केले. तर Reliance Jio ने खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमचा वापर ५ G सेवा देण्यासाठी करण्यात येणार आहे. याचप्रमाणे कंपनीने आता एक घोषणा केली ती म्हणजे, स्वदेशी ५ G तंत्रज्ञान विकसित करत आहेत. याला अमेरिकेमध्ये चाचणी करण्यात आलीय.