परमवीर सिंग यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्याचे अतिरीक्त पोलीस महासंचालक (कायदा सुव्यवस्था) परमवीर सिंग यांनी ३१ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन अटक केलेल्या पाचही जणांचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा दावा केला होता. अशाप्रकारे पुरावे जाहीर करून परमवीर सिंग यांनी कोर्टाचा अवमान केल्याचा दावा करत याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर ७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a393aa62-b061-11e8-91b7-cdca156642ba’]

काल सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या या पत्रकार परिषदेवर टिका केली होती. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पोलीस पत्रकार परिषद कशी काय घेऊ शकतात? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने  उपस्थित  केला गेला होता. गोपनीय पुरावे पत्रकार परिषदेत दाखविणे आणि कोर्टाचा अवमान केल्याबद्दल परमवीर सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

पत्रकार परिषद घेऊन त्यात या प्रकरणाशी संबंधित पुरावे जाहीरपणे सादर केल्याने राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) परमवीर सिंग अडचणीत येण्याची शक्यता आहे.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी