बिल्डर कर्नाटकींचा जामिन रद्द व्हावा म्हणून उच्च न्यायालयात याचिका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांचा जामिन रद्द व्हावा म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असुन त्यावर येत्या आठ दिवसाच्या आत सुनावणी होणार असल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी दिली आहे. दरम्यान, बिल्डर कर्नाटकी, राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक मानकर आणि इतरांविरूध्द शहर पोलिस दलातील गनमॅन शैलेश जगताप यांचे भाऊ आणि सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्‍त केल्याप्रकरणी गुन्हा समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b83e373d-c18b-11e8-8eb6-e923204b1318′]

समर्थ पोलिस ठाण्याच्या समोरील जागेच्या वादातुन जितेंद्र जगताप यांनी काही महिन्यांपुर्वी हडपसर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये बिल्डर कर्नाटकी, नगरसेवक मानकर आणि इतरांच्या नावांचा उल्‍लेख होता. सर्वप्रथम लोहमार्ग पोलिसांनी अकस्मित गुन्हयांची नोंद केली. त्यानंतर तपासाअंती त्यांनी बिल्डर कर्नाटकी, नगरसेवक मानकर आणि इतरांविरूध्द जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्‍त केल्याप्रकरणी त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला. सदरील गुन्हा तपासासाठी समर्थ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

सांगलीतील वाळवा तालुक्यात ७ मुलींचे लैंगिक शोषण 

पोलिसांनी याप्रकरणी काही जणांना अटक केली. त्यानंतर नगरसेवक मानकर यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. त्यांचा जामिन अर्ज फेटाळला. त्यानंतर मानकर यांनी उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जामिन मिळावा म्हणून अर्ज केला. मात्र, तो फेटाळण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने मानकर यांना 10 दिवसाच्या आत पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश दिले. मानकर हे पोलिसांसमोर हजर झाले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेस सुरवात झाली.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d2f7579f-c18b-11e8-b9ea-279d3678a082′]

दरम्यान, बिल्डर कर्नाटकी यांनी जामिन मिळावा म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला. त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे. दरम्यान, बिल्डकर कर्नाटकी यांचा जामिन अर्ज रद्द व्हावा म्हणुन जितेंद्र जगताप यांचा मुलगा जयेश जितेंद्र जगताप यांनी अ‍ॅड. सत्यव्रत जोशी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर आगामी आठ दिवसांमध्ये सुनावणी होणार असल्याची माहिती याचिकाकर्त्यांकडून देण्यात आली आहे.