18 नाही तर आता 21 असणार मुलींचे लग्नाचे वय, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात मुलींच्या लग्नाचे वय सध्या १८ वर्ष असून लवकरच ते वाढवले जाण्याची शक्यता आहे. भाजप नेते अश्निनी उपाध्याय यांनी मुलींचे लग्नाचे वय वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. यामध्ये भारत सरकारला त्यांनी पक्षकार बनवले आहे. याचिका दाखल करण्याविषयी बोलताना ते म्हणाले कि, मुलींचे लग्नाचे वय कमी असणे हा संविधानाने सर्वांना दिलेल्या समान अधिकाराचे उल्लंघन आहे.

अश्निनी उपाध्याय यांनी या याचिकेत म्हटले आहे कि, मुलांचे लग्नाचे वय २१ वर्ष असून मुलींचे १८ वर्ष आहे. याला कशाचा आधार आहे. आणि यामुळे मुलींना समाजात पुढे येण्यासाठी आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी अडचण ठरत आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटले आहे कि, कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय मुलींचे लग्नाचे वय १८ ठरवणे योग्य नाही. या याचिकेत त्यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितले आहे कि, मुलींचे लग्नाचे वय मुलांपेक्षा कमी असणे ग्लोबल ट्रेंड्सच्या विरोधात आहे. त्याचबरोबर या निर्णयामुळे संविधानाच्या कलम १४, १५ आणि २१ चे देखील उल्लंघन होत आहे.

सुप्रीम कोर्टात विविध विषयांवर जवळपास ५० याचिका दाखल करणाऱ्या उपाध्याय यांनी कोर्टात माहिती दिली कि, जगभरात १२५ देशांमध्ये मुलींचे आणि मुलांचे लग्नाचे वय समान आहे. त्यामुळे भारतात देखील याची मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत आहे. यामुळे मुलींना शिक्षणासाठी अधिक वेळ मिळणार असल्याचा तर्क देखील त्यांनी मांडला. त्यामुळे कमी वयात लग्न झाल्याने मुलींच्या करियरवर देखील याचा परिणाम होतो. त्यामुळे मुलींना आत्मनिर्भर बनण्यास देखील अवधी मिळू शकतो. कमी वयात आई झाल्याने मुलींचा जीव देखील जातो.

दरम्यान, त्यांच्या या याचिकेवर सुप्रीम कोर्ट काय उत्तर देते आणि आणि भारत सरकार यामध्ये काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.त्याचबरोबर मुलींना देखील मुलांइतकाच अवधी मिळायला हवा असेदेखील त्यांनी म्हटले.

आरोग्यविषयक वृत्त