कर्णधार विराट कोहलीला होणार अटक ? जाणून घ्या प्रकरण

पोलिसनामा ऑनलाईन – ऑनलाइन जुगार प्रकरणी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मद्रास हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. विराटवर आरोप करण्यात आला आहे की, तो ऑनलाइन जुगार खेळाण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

याचिकेत असे म्हटले आहे की जिथे ऑनलाइन जुगार खेळला जातो अशा अ‍ॅप्सवर बंदी घाला. यामुळे तरुणांवर चुकीचा परिणाम होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ऑनलाइन जुगार अ‍ॅपमध्ये क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री तमन्नाचा जाहिरातीसाठी वापर केला जातो.

चेन्नई येथील वकिलाने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. वकिलाच्या म्हणण्यानुसार अशा गोष्टींचा प्रचार करणाऱ्या स्टार्सना अटक केली पाहिजे. एका युवकाने अशा एका अ‍ॅपवर जुगार खेळण्यासाठी पैसे घेतले होते, मात्र जेव्हा पैसे भरले नाहीत तेव्हा त्याने आत्महत्या केली. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी 4 ऑगस्टला होणार आहे. लॉकडाऊन झाल्यापासून कोहली मुंबईतील घरी पत्नी अनुष्का शर्मासोबत आहे. काही काळ सोशल मीडियावर ब्रॅण्ड्सची जाहिरात करत होता.