केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना वाटते पेट्रोल डिझेलवर बोलणे म्हणजे ‘धर्मसंकट’

अहमदाबाद : देशात सातत्याने इंधनाच्या किंमती वाढत आहेत़ काही शहरातील पेट्रोलच्या किंमती शंभराच्या पुढे गेल्या आहेत. देशभरातील विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर प्रचंड टिका केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनाही आता पेट्रोल डिझेलवर बोलणं म्हणजे धर्मसंकट असल्याचे वाटत आहे.

इंधनाच्या वाढत्या किंमतीवर अहमदाबादमध्ये एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, या किंमती कधी कमी होणार यावर आताच काही सांगू शकत नाही. आता यावर काही भाष्य करणे म्हणजे धर्मसंकट आहे.

पेट्रोल -डिझेलवर केंद्र सरकार जो भरमसाठ कर लावतो तो कधी कमी करणार या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, या प्रश्नाने धर्म संकटात टाकलयं. केंद्र सरकार व राज्य सरकारने यावर चर्चा करुन मार्ग काढण्याची गरज आहे, असे त्यांनी मत व्यक्त केले.