पेट्रोल-डिझेलचे दर आजही वाढले, नांदेडसह अनेक ठिकाणी पेट्रोल 100 च्या पुढे, जाणून घ्या तुमच्या शहरातील रेट

मुंबई : स्थानिक बाजारात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीसह महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचा भाव 100 रुपये प्रति लीटरच्या पुढे गेला आहे. मे महिन्यात आतापर्यंत 6 दिवस पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढ झाली होती. आज (बुधवार, 12 मे 2021) सातव्या दिवशी सुद्धा ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी किंमतीत वाढ केली. मुंबईत सुद्धा आता पेट्रोलचा भाव 100 रुपये प्रति लीटरकडे वेगाने चालला आहे. अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलात तेजी दिसून आहे, सोबतच स्थानिक बाजारात अव्वाच्या-सव्वा टॅक्स आणि वाहतुकीमुळे पेट्रोल-डिझेलचे भाव विक्रमी स्तरावर पोहचले आहेत.

महाराष्ट्राच्या नांदेडमध्ये आज पेट्रोलचा भाव 100.54 रुपये प्रति लीटर आहे. अशाच प्रकारे आज राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पेट्रोल 100.97 रुपये आणि गंगानगरमध्ये 102.96 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहचले आहे. याशिवाय मध्य प्रदेशात अनूपपुर, नगराबांध, रीवा आणि छिंदवाडाम्ये पेट्रोलचे भाव अनुक्रमे 102.66 रुपये, 103.31 रुपये, 102.30 रुपये आणि 101.93 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहचले आहेत.

पेट्रोल आणि डिझेलचा आजचा भाव
देशातील आईल मार्केटिंग कंपन्यांनी देशभरातील विविध शहरांसाठी पेट्रोलच्या भावात 19 ते 26 पैसे प्रति लीटर आणि डिझेलच्या भावात 24 ते 28 पैसे प्रति लीटरपर्यंत वाढ केली आहे. दिल्लीत आज प्रति लीटर पेट्रोलचा भाव 92.05 आणि डिझेलचा भाव 82.61 रुपये प्रति लीटरवर पोहचला आहे. अशाच प्रकारे मुंबईत पेट्रोलचा नवीन भाव 98.36 रुपये आणि डिझेलचा भाव 89.75 रुपये प्रति लीटर आहे.