पेट्रोल 8 पैसे तर डिझेल 9 पैसे प्रति लिटरनं महागलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ही वाढ सलग तिसऱ्या दिवशी झाली असून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 8 पैशांची तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9 पैशांची वाढ झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाही
शनिवार, 14 सप्टेंबर रोजी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 8 पैशांची वाढ करण्यात आली. त्याचबरोबर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9 पैशांची वाढ झाली आहे. ऊर्जा तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत या आठवड्यात कमी राहतील. कच्च्या तेलाची किंमत गेल्या 15 दिवसांत जवळपास स्थिर राहिली आहे, त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाही.

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार शनिवारी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे ग्राहकांना 71.97 रुपये, 77.65 रुपये, 74.70 रुपये आणि 74.78 रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल मिळत आहे. त्याचबरोबर, डिझेलच्या किंमतीत 9 पैशांनी कपात केल्यानंतर, आज दिल्ली आणि कोलकातामध्ये डिझेल 65.37 आणि 67.78 रुपये प्रति लिटर मिळत आहे. मुंबई आणि कोलकातामध्ये डिझेल 10 पैशांनी वाढवून 68.56 आणि लिटर 69.9 रुपये झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –