खुशखबर ! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कमालीची ‘घट’, प्रति लिटर 15 पैशांनी ‘स्वस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रुड ऑईलच्या किंमतीत कमालीची घट झाल्याने देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर मोठा फरक पडला आहे. आज (शुक्रवार) पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर १५ पैशांची घट झाली आहे तर डिझेलच्या किंमतीत १३ पैशांची घट झाली आहे.

हे आहे पेट्रोलचे दर
आयओसीएलनुसार दिल्लीत १५ पैशांनी पेट्रोलच्या भावात कपात झाली असून आता ७२.०८ रूपये प्रति लिटर पेट्रोल मिळेल तर कोलकत्ता येथे १४ पैशांची घट झाली असून पेट्रोल ७४.७४ रूपये प्रति लिटर झाले आहे. मुंबईत देखील पेट्रोल स्वतः झाले असून प्रति लिटर १५ पैशांची कपात झाल्याने आता पेट्रोल ७७.७४ रूपये प्रति लिटर मिळणार आहे. पुण्यात पेट्रोल १५ पैशांनी स्वस्त झाले असून ७७.५४ रूपये प्रति लिटर मिळणार आहे.

हे आहेत डिझेलचे भाव
दिल्ली – ६५.७५ रूपये प्रति लिटर
मुंबई – ६८.९४ रूपये प्रति लिटर
चेन्नई – ६९.४८ रूपये प्रति लिटर
कोलकत्ता – ६८.०८ रूपये प्रति लिटर
पुणे – ६७.४३ रूपये प्रति लिटर

आरोग्यविषयक वृत्त –