Petrol-Diesel Price : ‘पेट्रोल-डिझेल’चे दर वाढले, जाणून घ्या 2 ऑगस्टचे तुमच्या शहरातील रेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोलच्या किमती मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत, परंतु आता अनेक शहरात याच्या दरात बदल दिसून आला आहे. मात्र, दिल्लीत डिझेल 8.38 रुपये प्रति लीटरने स्वस्त करण्यात आले आहे. दिल्ली सरकारने कालच या इंधनावरील वॅटचा दर कमी केला. रविवारी (2 ऑगस्ट) दिल्लीत पेट्रोल 80.43 रुपये प्रति लीटर विकले जात आहेत. तर मुंबईत 87.19 रुपये प्रति लीटर तर डिझेल 80.11 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई          87.19 – 80.11
पुणे            87.13 – 78.82
ठाणे           86.96 – 78.64
अहमदनगर 87.56 – 79.26
औरंगाबाद  87.72 – 79.39
धुळे           87.07 – 78.79
कोल्हापूर  87.92 – 79.61
नाशिक     87.41 – 79.10
रायगड     87.16 – 78.83

जुलै महिन्यात केवळ डिझेलच झाले होते महाग
जुलै महिन्यात सरकारी तेल कंपन्या केवळ डिझेलचेच दर वाढवत होत्या. मागील महिन्यात 10 टप्प्यात डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत, यामुळे डिझेल 1.60 रुपये प्रति लीटर महागले आहे. पेट्रोलच्या दरात की एक महीन्यापासून कोणतीही वाढ झालेली नाही. याच्या दरात 5 पैसे प्रति लीटरची शेवटची वाढ मागील 29 जूनरोजी झाली होती.

प्रत्येक राज्य पेट्रोल व डिझेलवर वेगवेगळा स्थानिक विक्रीकर किंवा मुल्यवर्धीत कर लावत आहे. या कारणामुळे राज्यानुसार पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. पेट्रोलच्या दरात शेवटी 29 जूनला बदल झाला होता. मागच्या आठवड्यात डिझेलचे दर 25 वेळा आणि पेट्रोलचे दर 21 वेळा वाढले आहेत. 7 जूनपासून आतापर्यंत पेट्रोल 9.17 रुपये आणि डिझेल 11.66 रुपयांनी महागले आहे.

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता