Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल झाले आणखी ‘स्वस्त’, जाणून घ्या 23 सप्टेंबरचे तुमच्या शहरातील रेट

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून डिझेलच्या किंमती लागोपाठ कमी होत आहेत, ज्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत असल्याचे दिसत आहे. बुधवारी (23 सप्टेंबर) मुंबईत दिल्लीत पेट्रोल 87.74 रुपये, तर डिझेल 77.73 प्रति लीटरने विकले जात आहे.

उद्योग जगतातील प्राथमिक आकड्यांनुसार, 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान पेट्रोलची विक्री वार्षिक अधारावर 2.2 टक्के आणि मागील महिन्याच्या तुलनेत 7 टक्के वाढली आहे. मात्र, डिझेलच्या विक्रीत घसरण सुरू राहिली. सप्टेंबर महिन्यात ही वार्षिक आधारावर 6 टक्के आणि मासिक आधारावर 19.3 टक्के कमी राहिली आहे. ही पहिली वेळ आहे, जेव्हा जगातील तिसर्‍या सर्वात मोठ्या आयातदार देशात पेट्रोलच्या विक्रीत 25 मार्चपासून देशभरात लागू लॉकडाऊनच्यानंतर किंचित वाढ नोंदली गेली आहे.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई 87.74 – 77.73
पुणे 87.57 – 76.40
ठाणे 87.85 – 76.65
अहमदनगर 88.32 – 77.14
औरंगाबाद 88.12 – 76.94
धुळे 88.22 – 77.05
कोल्हापूर 87.71 – 76.57
नाशिक 87.94 – 76.76
रायगड 87.46 – 76.27

प्रत्येक राज्य पेट्रोल व डिझेलवर वेगवेगळा स्थानिक विक्रीकर किंवा मुल्यवर्धीत कर लावत आहे. या कारणामुळे राज्यानुसार पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात.

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता