Petrol and Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या किमतीची आकाशाला गवसणी , जाणून घ्या राज्याच्या शहरातील दर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पेट्रोल-डिझेलच्या किमती मागील चार दिवसापासून स्थिर आहेत. शनिवारी (04 जुलै) मुंबईत पेट्रोल 87.19 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 78.83 रुपये प्रति लीटरने विकले जत आहे. दरम्यान पेट्रोलच्या दरात एकुण 9.17 रुपये आणि डिझेलच्या दरात 11.14 रुपये प्रति लीटरची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत तर डिझेलची किंमत पेट्रोलपेक्षा जास्त आहे.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई            87.19 – 78.83
पुणे             87.13 – 77.58
ठाणे            87.33 – 78.96
अहमदनगर   87.17 – 77.63
औरंगाबाद    87.49 – 77.93
धुळे             87.65 – 78.09
कोल्हापूर     87.44 – 77.91
नाशिक        87.46 – 77.90
रायगड        87.04 – 77.46

पेट्रोलचे दर 2018 मध्ये गेले होते सर्वात वर
तेल कंपन्या संपूर्ण देशात समानपद्धतीने दर वाढवतात. परंतु, राज्यांमध्ये सध्या वेगवेगळ्या दराने विक्रीकर किंवा वॅट लागल्याने किरकोळ दर वेगवेगळे असतात. 16 ऑक्टोबर 2018 रोजी दिल्लीत डिझेलचे दर 75.69 रुपये प्रति लीटर सर्वकालिन उच्चस्तरावर पोहचले होते. आता डिझेलच्या किमतीने हा रेकॉर्ड मागे टाकला आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत 4 ऑक्टोबर 2018 ला 84 रुपये प्रति लीटरच्या सर्वकालिन उच्चस्तरावर पोहचली होती.

जाणून घ्या किती आहे उत्पादन शुक्ल व अन्य कर
पेट्रोलच्या मुळ किमतीत कर 50.69 रुपये प्रति लीटर म्हणजेच 64 टक्के आहे. यामध्ये 32.98 रुपये केंद्रीय उत्पादन शुल्क आणि 17.71 रुपये स्थानिक विक्रीकर किंवा वॅट आहे. तर डिझेलच्या मुळ किमतीत कर सुमारे 63 टक्के म्हणजेच प्रति लीटर 49.43 रुपये आहे. यामध्ये 31.83 रुपये केंद्रीय उत्पादन शुल्क आणि 17.60 रुपये वॅट आहे.

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता