Petrol Price Today : इंधनाच्या किंमतीत लागोपाठ 11व्या दिवशी दिलासा, चेक करा तुमच्या शहरातील 1 लीटर पेट्रोल-डिझेलचे भाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारी तेल कंपन्यांनी लागोपाठ 11व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केलेली नाही. देशाच्या राजधानीसह सर्व महानगरांमध्ये इंधनाच्या किंमती स्थिर आहेत. मागील आठवड्यात गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीत 16 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत 14 पैशांची कपात करण्यात आली होती. मुंबईत पेट्रोलचा दर 96.83 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचा दर 87.81 रुपये प्रति लीटर आहे.

देशात कोरोनाचा कहर पसरलेला असल्याने कच्च्या तेलाच्या किंमती लगोपाठ नरम दिसत आहेत. यामुळे पेट्रोलच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. शुक्रवारी डब्ल्यूटीआय क्रूडाचा भाव 1.16 टक्के वाढून 62.14 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत होता. तर ब्रेंट क्रूडचा भाव 1.09 टक्केच्या उसळीसह 66 डॉलरवर पोहचला होता. याशिवाय सोमवारी व्यवहार खुला झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात घट नोंदली गेली.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर
मुंबई 96.83 – 87.81
पुणे 96.42 – 86.08
ठाणे 96.52 – 86.16
अहमदनगर 97.05 – 86.70
औरंगाबाद 97.33 – 86.96
धुळे 96.68 – 86.35
कोल्हापूर 96.95 – 86.63
नाशिक 96.45 – 86.11
रायगड 96.38 – 86.01

प्रत्येक राज्य पेट्रोल व डिझेलवर वेगवेगळा स्थानिक विक्रीकर किंवा मुल्यवर्धीत कर लावत आहे. या कारणामुळे राज्यानुसार पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात.

असे वाढतात पेट्रोल-डिझेलचे दर
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि अन्य गोष्टी मिळवल्यानंतर दर जवळपास दुप्पट होतात. जर केंद्र सरकारची एक्साइज ड्यूटी आणि राज्य सरकारांचा वॅट हटवला तर डिझेल आणि पेट्रोलचा रेट जवळपास 27 रुपये लीटर राहिल, परंतु केंद्र असो की राज्य सरकार, दोन्ही कोणत्याही स्थितीत टॅक्स कमी करत नाहीत. कारण महसूलाचा एक मोठा भाग येथून येतो.

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर
प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती
तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा
1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता.