पेट्रोल डिझेलच्या दरातील भाववाढ सुरुच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – गेल्या ४ मेपासून सुरु असलेली पेट्रोल डिझेलमधील भाववाढ अजूनही सुरुच आहे. शनिवार, रविवारी भाववाढ झाली नव्हती. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा दर वाढविण्यात आले आहेत.
पुण्यात आज पेट्रोलच्या दरात २४ पैशांनी वाढ झाली.

पुण्यातील पेट्रोलचा दर आता ९८.५७ रुपये प्रति लिटर झाला आहे. डिझेलच्या दरात आज २७ पैशांनी वाढ झाली. पुण्यात डिझेलचा दर आता ८८.७१ रुपये प्रति लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरातही वाढ कायम आहे. पॉवर पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २३ पैशांनी वाढ झाली आहे. पॉवर पेट्रोलचा प्रति लिटर दर आता १०२.२५ रुपये इतका झाला आहे.