निवडणुका संपताच ‘पेट्रोल-डिझेल’ दरवाढीस सुरूवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील लोकसभा निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीस सुरूवात झाली आहे. लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान रविवारी संपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. यानंतर आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

दिल्ली, कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दरात पाच पैसे प्रति लिटर तर डिझेलच्या दरात ९ ते १० पैसे प्रित लिटर वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ होत होती. मात्र पेट्रोल कंपन्यांनी निवडणुकीदरम्यान देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. देशातील निवडणुका संतपताच तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यास सुरूवात केली आहे.

निवडणुकीदरम्यान पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवल्याने कंपन्यांना तोटा सहन करावा लागला होता. हा तोटा भरून काढण्यासाठी तेल कंपन्यांनी दरवाढ करण्यास सुरुवात केली आहे. तोटा भरून काढण्यासाठी तेल कंपन्या आणखी दर वाढ करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोमवारआधीच्या पंधरवड्यात इंधनदरात कपात होत होती. सोमवारपासून दर वाढायला सुरुवात झाली. यापूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढूनही १९ दिवसांपर्यंत पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर राहिले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like