सर्वसामान्यांना दिलासा ! सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल – डिझेलच्या दरात घट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलच्या दरात घट झाल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. दिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्ये पेट्रोल शुक्रवारी 18 पैशांनी आणि चेन्नईमध्ये 19 पैशांनी स्वस्त झाले. तसेच डिझेलच्या दरही कमी झाले आहेत. दिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्ये 8 पैशांनी आणि चेन्नईमध्ये 9 पैशांनी डिझेल स्वस्त झाले आहे.

दिल्लीत 74.33 रुपए प्रति लीटर पेट्रोल
इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर कमी होऊन क्रमश: 74.33 रुपये, 76.96 रुपये, 79.93 रुपये आणि 77.21 रुपये प्रति लीटर झाले आहे. या चारही शहरांमध्ये डिझेलचे दरही कमी झालेले आहेत ते क्रमश: 67.35 रुपये, 69.71 रुपये, 70.61 रुपये आणि 71.15 रुपये प्रति लीटर झाले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये दिल्लीमध्ये पेट्रोल 28 पैसे प्रति लीटर स्वस्त झाले आहे आणि डिझेलचे दर 14 पैसे प्रति लीटरने कमी झाले आहेत.

कच्च्या तेलाच्या घसरणीमुळे अजून कमी होणार दर
सणासुदीचे दिवस असल्यामुळे घरगुती वापरासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. अशातच इंधनाच्या दरात घट झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच डिझेलच्या दरात कच्च्या तेलाच्या घसरणीमुळे आणखी घट होणार असल्याचे एंजल ब्रोकिंगच्या अनुज गुप्ता यांनी सांगिलते.

16 सप्टेंबर पासून 14 डॉलर ने क्रूड ऑइलची झाली घट
गुप्ता यांनी सांगितले की सौदी येथे झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर 16 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या देलाच्या दरात अठ्ठावीस वर्षानंतरची तेजी नोंदवण्यात आली होती. जेव्हा ब्रेंट क्रूडचा भाव 71.95 डॉलर प्रति बॅरल इतका झाला होता. मात्र त्या नंतर हा भाव आतापर्यंत 14 डॉलर प्रति बॅरल वर घसरला आहे.

visit : Policenama.com