सलग चौथ्या दिवशी पेट्रोल – डिझेलच्या किमतीत घट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुले पेट्रोल डिझेलच्या किमतीत कपात होत आहे.

तेल विपणन कंपन्यांकडून रविवारी पेट्रोलच्या दरात १२ पैसे, कोलकत्त्यामध्ये ३ पैसे, मुंबईत १२ पैसे आणि चेन्नईमध्ये १२ पैसे प्रति लीटर दर कमी करण्यात आले आहेत. तर डिझेलच्या किंमतीत २० पैसे, कोलकत्त्यामध्ये १५ पैसे आणि मुंबई आणि चेन्नईमध्ये प्रति लिटर २१ पैसे कपात करण्यात आली आहे.

इंडियन ऑयलच्या वेबसाईटनुसार, दिल्ली, कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किमती उतरून अनुक्रमे ७१. ५० रुपये , ७३. ७३ रुपये , ७७. १६ रुपये आणि ७४. २५ रुपये झाल्या आहेत. तर डिझेलच्या किमती या चार महानगरांमध्ये घटून अनुक्रमे ६६. १६ रुपये , ६८. ०६ रुपये , ६९. ३७ रुपये आणि ६९. ९८ रुपये प्रति लीटर झाल्या आहेत.