पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा भाववाढ; जाणून घ्या आजचे दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तेल कंपन्यांनी एक दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पुणे शहरात आज पेट्रोलच्या दरात १६ पैशांनी वाढ झाली. आता पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर ९९.३५ रुपये असणार आहे.

त्याचबरोबर डिझेलच्या दरात लिटरमागे २६ पैशांनी वाढ झाली आहे. आता डिझेलचा दर प्रति लिटर ८९.८५ रुपये असेल. पॉवर पेट्रोलच्या दरात २२ पैसे प्रति लिटर वाढ झाली आहे. आता शहरात पॉवर पेट्रोलचा दर १०३.०७ रुपये लिटर असणार आहे.