Petrol and diesel price today | पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol and diesel price today | तेल कंपन्यांनी एक दिवसाच्या विश्रांतीनंतर आज शनिवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात आज लिटरमागे ३३ पैशांनी वाढ करण्यात आली. आज पुण्यातील पेट्रोलचा दर प्रति लिटर १०६.५५ रुपये झाला आहे. Petrol and diesel price today | Petrol and diesel prices rise again today

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

डिझेल आज प्रति लिटर २७ पैशांनी महागले आहे. डिझेलचा दर आज ९५.६१ रुपये लिटर झाला आहे.
पॉवर पेट्रोलच्या दरातही प्रति लिटर ३४ पैशांनी वाढ झाली आहे. पॉवर पेट्रोलचा दर पुण्यात आज ११०.२४ रुपये लिटर झाला आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल चा दर आज १००.९१ रुपये लिटर तर, डिझेल ८९.८८ रुपये लिटर झाला आहे.

मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर १०६.९३ रुपये झाला असून डिझेल९७.४६ रुपये लिटर इतका आहे. कोलकत्तामध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. तेथे पेट्रोल १०१.०१ रुपये आणि डिझेल ९२.९७ रुपये लिटर झाले आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : Petrol and diesel prices rise again today