पेट्रोल, डिझेलमधील वाढीने महागाईचा पडणार मार

 मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

पेट्रोल आणि डिझेलमध्ये पुन्हा एकदा  दररोज वाढ होत असून आज पुन्हा पेट्रोलच्या दरात ३१ पैशांची वाढ झाली असून ते ८६़.५६ रुपयांवर जाऊन पोहचले आहे. आतापर्यंतचा पेट्रोलचा उच्चांक आहे. त्याचबरोबर डिझेलमध्ये तब्बल ४४ पैशांची वाढ झाली असून आता डिझेल ७५.८४ रुपयांवर गेले आहे.

[amazon_link asins=’B073QVG2GL,B07B14P728′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e3b956ef-af32-11e8-ad95-99397a4ae8fc’]

सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी रात्री पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ केल्याने संपूर्ण देशभरात पेट्रोल व डिझेलच्या किमंतीने उच्चांकी पातळी गाठली आहे. या दरवाढीने पुण्यातील पेट्रोलचा एका लिटरचा दर ८६.५० रुपये तर डिझेलचा दर ७४.३० रुपये इतका वाढला आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचा दर राज्यात सर्वाधिक ८७.९० रुपये इतका आहे.

डिझेलचे दर वाढल्याने ट्रक, टेम्पो आपल्या दरामध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम होऊन दुध, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचा भार शेवटी सर्वसामान्य ग्राहकांवर पडणार आहे. नोव्हेंबर २०१४ नंतरचे हे सर्वाधिक दर असून त्याची झळ सर्वसामान्यांना सोसावी लागत आहे.

केंद्र आणि राज्य सरकारकडून इंधनावर सर्वाधिक कर गोळा केले जात असल्याने प्रत्येक राज्यात पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये तफावत दिसून येते. महाराष्ट्रामध्ये पेट्रोलवर सर्वाधिक विविध करांचा बोजा असल्याने राज्याच्या सर्वच शहरांमध्ये इतर राज्यांतील शहरांच्या तुलनेत दर अधिक आहेत.

पेट्रोल – डिझेलच्या दरात विक्रमी वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात एका बाजूला इंधनाचे दर वाढत असतानाच डॉलर्सच्या तुलनेत रुपयाची दररोज वेगाने घसरण होत आहे. त्याचा परिणाम इंधन आयातीवर पडत आहे. संपूर्ण देशभरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली नाही. त्यात शहरीकरण होत असल्याने नोकरी, व्यवसायानिमित्त लोकांचा दररोजचा प्रवास वाढला आहे. परंतु, देशात अपवाद सोडला तर कोणत्याही शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली नाही. त्याचा परिणाम वैयक्तिक वाहनांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस इंधनाची गरज वेगाने वाढत आहे. आपण जवळपास ८६ टक्के इंधन आयात करतो.

जाहिरात

गेल्या काही दिवसांपासून डॉलर्सच्या तुलनेत रुपया वेगाने घसरत आहे. सध्या एका डॉलरला ७० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे इंधन आयातीच्या खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे तेल कंपन्या सातत्याने आपले दर वाढत आहे. त्यात पेट्रोलवर सर्वाधिक कर असल्याने व त्यातून केंद्र सरकार व राज्य सरकार मालामाल होत असल्याने ते कर कमी करण्याचा विचार करीत नाही.

सामाजिक एकोप्यासाठी एकत्र या, शरद पवार यांचे सर्वपक्षीयांना आवाहन

जुलै महिन्यात असाच इंधन दराचा भडका उडला होता. त्यावेळी पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी राज्यांनी आपल्या करात कपात करावी, अशी सूचना केली होती. पण, गोवा, केरळ वगळता कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही.एका बाजूला इंधनाचे दर वाढत असताना तेल कंपन्यांच्या फायद्यातही भरमसाट वाढ होत आहे. तेल कंपन्यांना उत्पन्नात  गतवर्षी पेक्षा यंदाच्या पहिल्या तिमाहीत नफ्यामध्ये २० टक्के वाढ झाली आहे. तर करपूर्व नफ्यामध्ये ७५ टक्के वाढ झाली आहे.

पेट्रोल, डिझेलच्या या भडक्याने वाहतूक संघटनांनी जुलैमध्ये एक दिवसांचा संपही पुकारला होता. पण, त्याकडे लक्ष देण्यास कोणाचीही तयारी नाही.डिझेल दरात होणारी वाढ अधिक असून त्याचा परिणाम संपूर्ण वाहतूक क्षेत्रावर होऊन सामान्यांना त्याची मोठी झळ बसण्याची शक्यता आहे.

मळगंगा देवी मंदिरातील चाेरी : पाेलिसांनी ‘त्या’ चाेरट्यांना ठाेकल्या अवघ्या १२ तासांच्या आत बेड्या


प्रमुख महा नगरातील पेट्रोलचे दर (रुपये)

  • दिल्ली –        ७८.८४
  • कोलकाता –  ८१.७६
  • मुंबई –        ८६.५६
  • पुणे –          ८६.५०
  • नागपूर –      ८६.७३
  • नांदेड –       ८७.९०जाहिरात