14 दिवसात पेट्रोल 7.52 रुपये तर डिझेल 8.28 रुपयांनी महागले, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : इंधनाच्या दरात लागोपाठ 14 व्या दिवशीसुद्धा वाढ करण्यात आली आहे. आज शनिवारी देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 78.88 रुपये आणि डिझेलची किंमत 77.67 रुपयांवर पोहचली आहे. शनिवारी पेट्रोलच्या किंमतीत 51 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत 61 पैशांची वाढ करण्यात आली. इंधनाच्या दरात लागोपाठ 14 दिवशी वाढ केल्याने आतापर्यंत पेट्रोल 7.52 रुपये आणि डिझेल 8.28 रुपये प्रति लीटरने महागले आहे.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई 85.70 – 76.11
पुणे 85.35 – 74.54
ठाणे 84.90 – 74.08
अहमदनगर 85.47 – 74.76
औरंगाबाद 86.03 – 75.30
धुळे 85.57 – 74.77
कोल्हापूर 85.62 – 74.83
नाशिक 85.16 – 74.36
रायगड 85.52 – 74.69

पेट्रोल आणि डिझेल दरवाढ संपूर्ण देशात झाली आहे. मात्र, राज्यांचे विविध स्थानिक कर आणि वॅटमुळे दरांमध्ये फरक दिसून येत आहे. इंधनाचे दर 7 जूनपासून वाढवण्यास सुरूवात झाली होती. यापूर्वी लॉकडाऊनमुळे किमतीमध्ये लागोपाठ 83 दिवस वाढ केली नव्हती. परंतु, याकाळात कच्च्या तेलाचे किंमती प्रचंड घसरल्या होत्या, तरी देखील किमती कमी देखील केल्या नाहीत. याउलट सरकारने टॅक्स वाढवून किंमती स्थिर असल्याचे भासवले.

भारतात पेट्रोल-डिझेलवर सर्वात जास्त टॅक्स

देशात पेट्रोल-डिझेलवर टॅक्स 69 टक्के झाला आहे. जो जगातील सर्वात जास्त आहे. मागच्या वर्षीपर्यंत भारतात पेट्रोल-डिझेलवर 50 टक्के टॅक्स होता. जगाचा विचार केल्यास विकसित अर्थव्यवस्थेत म्हणजेच अमेरिकेत एकुण किमतीच्या 19 टक्के, जपानमध्ये 47 टक्के, ब्रिटनमध्ये 62 टक्के आणि फ्रान्समध्ये 63 टक्के टॅक्स लागतो.