×
Homeताज्या बातम्याPetrol Diesel CNG Price Hike In Pune | सीएनजी वाहन चालकांना मोठा...

Petrol Diesel CNG Price Hike In Pune | सीएनजी वाहन चालकांना मोठा झटका ! राज्य शासनाने दिलेला दिलासा तेल कंपन्यांनी घेतला हिरावून; सीएनजीच्या किंमतीत 5.80 रुपयांनी वाढ, जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol Diesel CNG Price Hike In Pune | राज्य शासनाने १ एप्रिलपासून व्हॅटच्या दरात घट केल्याने सीएनजीचे दर प्रति किलो ६ रुपये ३० पैशांनी घटले होते. हा दिलासा केवळ पाच दिवसच टिकला. तेल कंपन्यांनी सीएनजीच्या दरात एकाच दिवशी ५ रुपये ८० पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे व्हॅट कमी केल्याचा दिलासा औट घटकेचा ठरला आहे.
राज्य शासनाने व्हॅट (VAT) कमी केल्याने सीएनजीचा प्रति किलो दर ६२.२० रुपयांपर्यंत खाली आला होता. तेल कंपन्यांनी त्यात वाढ केल्याने आजपासून सीएनजीचा दर ६८ रुपये किलो झाला आहे.

सीएनजी गॅसच्या मिश्रणात एका विशिष्ट आयात करण्यात येणार्‍या वायूची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात दुप्पट झाली आहे. त्यामुळे ही मोठी दरवाढ करण्यात येत असल्याचे  ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले आहे.

राज्य शासनाने व्हॅटवरील करात १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्क्यांपर्यंत कमी केला होता.
त्यामुळे सीएनजी व घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस स्वस्त झाला  होता.
पण, तेल कंपन्यांनी दरवाढ करुन हा दिलासा खावून टाकला आहे.
सीएनजीबरोबरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात लिटरमागे ८३ पैशांची वाढ करण्यात आली आहे. पुण्यात बुधवारी पेट्रोलचा दर ११९.९६ रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरातही ८३ पैशांनी वाढ झाली असून आता पॉवर पेट्रोलचा दर १२४.४६ रुपये लिटर झाला आहे. (Petrol Diesel CNG Price Hike In Pune)

डिझेलच्या दरातही लिटरमागे ८३ पैशांनी वाढ झाली आहे. डिझेलचा दर आता १०२.६७ रुपये लिटर झाला आहे.
ही दरवाढ अजूनही सुरुच राहणार असल्याचे तज्ञांचे मत आहे.

Web Title :- Petrol Diesel CNG Price Hike In Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Charity Pune Division | 2 हजार प्रकरणे निकाली काढून धर्मादाय पुणे विभाग महाराष्ट्रात पुन्हा अव्वल

 

Tara Sutaria Swimsuit Photo | तारा सुतारियानं स्विमिंग सुट घालून दिल्या बोल्ड पोज, व्हायरल फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा

 

Nikki Tamboli Bold Photo | निक्की तांबोळीनं रिवालिंग साडी नेसून दिल्या किलर पोज, फोटो पाहून वाढले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके..

 

Neha Sharma Bedroom Photo | नेहा शर्मानं केल्या बोल्डनेसच्या सगळ्या हद्दपार, फोटो पाहून चाहते झाले घायाळ..!

Must Read
Related News